NO CASH! आता फक्त FASTag किंवा UPI वरूनच टोल द्यावा लागणार; लवकरच अंमलबजावणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 20:27 IST2026-02-20T20:27:48+5:302026-02-20T20:27:48+5:30

NO CASH On Toll Plaza News: देशभरातील टोल प्लाझावर रोखीचे व्यवहार लवकरच बंद केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

no cash payment accepted now toll plaza will have to be paid only through fastag or upi implementation to be done soon | NO CASH! आता फक्त FASTag किंवा UPI वरूनच टोल द्यावा लागणार; लवकरच अंमलबजावणी होणार

NO CASH! आता फक्त FASTag किंवा UPI वरूनच टोल द्यावा लागणार; लवकरच अंमलबजावणी होणार

NO CASH On Toll Plaza News: देशात संपूर्णपणे डिजिटल राष्ट्रीय महामार्ग टोल प्रणाली विकसित करण्यासाठी आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण १ एप्रिल २०२६ पासून राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझावर रोख पेमेंट पूर्णपणे बंद करण्याचा विचार करत आहे. ही प्रणाली लागू झाल्यानंतर सर्व टोल पेमेंट केवळ डिजिटल म्हणजेच FASTag किंवा UPI माध्यमांद्वारेच केले जातील. 

या प्रस्तावाचे उद्दिष्ट इलेक्ट्रॉनिक टोल संकलनाचे एकत्रित फायदे मिळवणे आणि टोल प्लाझा ऑपरेशन्सची कार्यक्षमता तसेच विश्वासार्हता वाढवणे आहे. डिजिटल परिवर्तनामुळे लेनची क्षमता वाढेल. टोल प्लाझांवरील गर्दी कमी होण्यास मदत होऊ शकेल. पेमेंट प्रक्रियेत पारदर्शकता आणि एकसमानता येईल. एकंदरीतच ही प्रणाली लागू केल्यास महामार्गावरील प्रवास सोपा होऊ शकणार आहे. 

FASTag मुळे देशातील टोल संकलन प्रणालीमध्ये लक्षणीय बदल

गेल्या काही वर्षांत ९८ टक्क्यांहून अधिक फास्टॅगच्या वापरामुळे देशातील टोल संकलन प्रणालीमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. आताच्या घडीला बहुतेक टोल पेमेंट वाहनांवर बसवलेल्या आरएफआयडी-आधारित फास्टॅग वापरून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्वीकारले जाते. यामुळे टोल प्लाझावर अखंड आणि संपर्करहित प्रवास शक्य होतो. राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझावर यूपीआय पेमेंट सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे प्रवाशांना जलद आणि सोयीस्कर डिजिटल पेमेंट पर्याय उपलब्ध झाले आहेत.

डिजिटायझेशनला चालना मिळण्यास मदत

टोल प्लाझा नियमांनुसार, एखादे वाहन वैध FASTag शिवाय टोल प्लाझामध्ये प्रवेश करते आणि रोख रक्कम भरते, तर त्याला लागू शुल्काच्या दुप्पट शुल्क आकारले जाते. UPI द्वारे केलेल्या पेमेंटवर वाहन श्रेणीसाठी लागू शुल्काच्या १.२५ पट शुल्क आकारले जाते. या उपक्रमांमुळे रोख व्यवहारांवरील अवलंबित्व कमी होण्यास आणि टोल प्रणालीच्या डिजिटायझेशनला चालना मिळण्यास मदत झाली आहे.

दरम्यान, टोल प्लाझा मूल्यांकनांवरून असे दिसून येते की, रोख रकमेमुळे गर्दीच्या वेळेत जास्त वेळ वाट पाहणे आणि टोल पेमेंट करताना वाद होतात. पूर्णपणे डिजिटल पेमेंट प्रणाली लागू केल्याने ऑपरेशनल कार्यक्षमता मजबूत होईल. वाहतूक व्यवस्थापन सुधारेल आणि विलंब कमी होईल. देशभरातील राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवरील १,१५० हून अधिक टोल प्लाझांवर वापरकर्त्यांचा सुलभतेने प्रक्रिया करता येऊ शकेल.

 

Web Title : टोल प्लाजा पर नकद बंद: FASTag, UPI अनिवार्य होगा

Web Summary : टोल प्लाजा पर नकद भुगतान 1 अप्रैल, 2026 से पूरी तरह बंद हो जाएगा। केवल FASTag और UPI भुगतान ही स्वीकार किए जाएंगे। इसका उद्देश्य राजमार्ग यात्रा को सुगम बनाने के लिए दक्षता में सुधार करना और भीड़ को कम करना है।

Web Title : No Cash at Toll Plazas: FASTag, UPI Mandatory Soon

Web Summary : Cash payments at toll plazas will be fully stopped from April 1, 2026. Only FASTag and UPI payments will be accepted. This aims to improve efficiency and reduce congestion for seamless highway travel.