शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

"मुलगी होईल या भीतीने नितीश कुमार यांनी दुसरे मूल जन्माला घातले नाही"

By बाळकृष्ण परब | Updated: November 27, 2020 17:58 IST

Nitish Kumar News : महाआघाडीचे नेते आणि सत्ताधारी जेडीयू आणि भाजपाच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता आरोप-प्रत्यारोपांचे हे सत्र वैयक्तिक पातळीवर पोहोचले आहे.

ठळक मुद्देबिहार विधानसभा निवडणुकीनंतर महाआघाडीचे नेते आणि सत्ताधारी जेडीयू आणि भाजपाच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार आरोप-प्रत्यारोप मुलगी होईल म्हणून नितीश कुमार यांनी दुसरे मूल जन्माला घातले नाहीनितीश कुमार हे हत्येच्या प्रकरणातील आरोपी आहेत

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा निसटता पराभव झाल्यापासून महाआघाडीचे नेते आणि सत्ताधारी जेडीयू आणि भाजपाच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता आरोप-प्रत्यारोपांचे हे सत्र वैयक्तिक पातळीवर पोहोचले आहे. आज बिहार विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होत असताना, मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी वैयक्तिक आरोप प्रत्यारोप सुरू केले. मुलगी होईल म्हणून नितीश कुमार यांनी दुसरे मूल जन्माला घातले नाही, अशी मुक्ताफळे तेजस्वी यादव यांनी उधळली.तेजस्वी यादव म्हणाले की, मुलगी जन्माला येईल या भीतीने नितीश कुमार यांनी दुसरे मूल जन्माला घातले नाही. नितीश कुमार हे हत्येच्या प्रकरणातील आरोपी आहेत. तसेच त्यांना कॉपीराइट उल्लंघनाच्या एका प्रकरणात २५ हजार रुपये दंड भरावा, असा आरोपही तेजस्वी यादव यांनी केला आहे.तेजस्वी यादव यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना संसदीय कार्यमंत्री विजयकुमार चौधरी यांनी सांगितले की, हत्येच्या प्रकरणाचा खटला पाटणा हायकोर्टाने आधीच फेटाळून लावला आहे. तसेच कोर्टाने या आरोपांवर कठोर टिप्पणी केली आहे. त्यानंतर संसदीय कार्यमंत्र्यांनी सभागृहाच्या कामकाजामधून हे आरोप फेटाळून लावण्यात यावेत, असे निवेदन विधानसभा अध्यक्षांना दिले आहे.त्यानंतर तेजस्वी यादव यांनी पुन्हा आरोप करण्यास सुरुवात केली. त्यानंतर नितीश कुमार यांनीही आरोप करण्यात सुरुवात केली. ते म्हणाले की, तेजस्वी यादव तुम्ही चार्जशिटेड आहात. माझ्या मित्राचे पुत्र आहात. त्यांना मी नेते बनवले होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले होते. तेजस्वी यादव यांची चौकशी करा. त्यांच्याविरोधात कारवाई होईल. हे खोटे बोलत आहेत. माझ्या भावासमान मित्राचा मुलगा आहे, म्हणून ऐकून घेतो, असा संताप नितीश कुमार यांनी व्यक्त केला.दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबावर हल्लाबोल केला होता. लालूप्रसाद यादव यांनी मुलगा हवा या हव्यासापोटी लालूप्रसाद यादव यांनी नऊ मुलींना जन्म दिला, लालूंना मुलींवर विश्वास नव्हता, असा आरोप नितीश कुमार यांनी केला होता.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारTejashwi Yadavतेजस्वी यादवPoliticsराजकारण