शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत पुन्हा निर्भया, जीव वाचवण्यासाठी तरुणीची बाल्कनीतून उडी

By admin | Updated: March 14, 2017 11:41 IST

राजधानी दिल्ली पुन्हा एकदा बलात्काराने हादरली असून 28 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - राजधानी दिल्ली पुन्हा एकदा बलात्काराने हादरली असून 28 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पूर्व दिल्लीत एका तरुणीवर पाच जणांनी बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. तरुणीने दिलेल्या माहितीनुसार आरोपींमधील एका तरुणाने आपल्याला घरी सोडतो असं सांगून दुस-याच ठिकाणी नेलं, आणि तिथे पाच जणांनी मिळून आपल्यावर सामूहिक बलात्कार केला. बाल्कनीमधून उडी मारुन तरुणीने आपली सुटका करुन घेतली. 
 
पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. यामधील तीन तरुण नोएडामधील बीपीओत काम करतात. एकजण दक्षिण दिल्लीतील फायनान्स कंपनीत काम करणारा आहे. पाचवा आरोपी बेरोजगार आहे. पीडित तरुणीचा घटस्फोट झाला असून तिला दोन मुलं आहे. रोजंदारीवर ती कम करुन आपलं आणि पोरांचं पोट भरते. 
 
पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार 'शनिवारी रात्री तिची आरोपींमधील ओळखीच्या असलेल्या तरुणाची भेट झाली. पण जेव्हा ती कारमध्ये बसली तेव्हा अजून दोघेजण आधीच त्यामध्ये होते'. 
 
'आपल्या मित्राला पांडव नगरमध्ये सोडायचं असल्याचं सांगून आपल्याला जबरदस्ती तिथे नेलं. तिथे पोहोचल्यावर जबरदस्ती करत मला नेलं आणि माझ्यावर बलात्कार केला. माझी शुद्ध हरपल्यानंतर मला एका खोलीत बंद करण्यात आलं. रविवारी सकाळी मला जाग आल्यानंतर मी मदतीसाठी आरडाओरड केली, पण मदत मिळाली नाही. आरोपी तरुण परत आल्यावर जेव्हा त्यांनी बाल्कनीचा दरवाजा उघडला तेव्हा सुटकेसाठी बाल्कनीतून खाली उडी मारली', असं पीडित तरुणीने सांगितलं आहे.
 
तरुणीला बाल्कनीतून उडी मारताना एका व्यक्तीने पाहिलं आणि पोलिसांना कळवलं. धक्कादायक म्हणजे तरुणी नग्न अवस्थेत रस्त्यावर मदतीसाठी याचना करत होती, मात्र कोणीही तिला मदत केली नाही. अखेर एका रिक्षावाल्याने तिचं म्हणणं ऐकून घेतलं आणि तिला मदत केली. त्यानंतर पोलिसांची टीम पोहोचली आणि तरुणीला रुग्णालयात दाखल केलं. तरुणीला रुग्णालयात भर्ती करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरु आहे. तिला काही गंभीर जखमा झाल्या आहेत.