काश्मिरात नवी दहशतवादी संघटना; TRF ने घेतली हंदवाडा हल्ल्याची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 03:16 PM2020-05-03T15:16:19+5:302020-05-03T15:21:49+5:30

जम्मू-काश्मिरात सध्या दोन दहशतवादी संघटनांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला टक्कर देण्याचा लश्कर-ए-तैयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटचा प्रयत्न आहे.

new militants outfit trf the resistance front took responsibility of handwara encounter sna | काश्मिरात नवी दहशतवादी संघटना; TRF ने घेतली हंदवाडा हल्ल्याची जबाबदारी

काश्मिरात नवी दहशतवादी संघटना; TRF ने घेतली हंदवाडा हल्ल्याची जबाबदारी

Next
ठळक मुद्देहल्ल्यात लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह पाच जवानांना हौतात्म्य आले होतेलष्कर ए तैयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटने घेतली हंदवाडा हल्ल्याची जबाबदारीटीआरएफने शनिवारी रात्री उशिरा हा हल्ला केला


नवी दिल्ली :जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. लष्कर ए तैयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्यात लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह पाच जवानांना हौतात्म्य आले.

जम्मू-काश्मिरात सध्या दोन दहशतवादी संघटनांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला टक्कर देण्याचा लश्कर-ए-तैयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटचा प्रयत्न आहे. वर्चस्वाच्या या लढाईतूनच टीआरएफने शनिवारी रात्री उशिरा हा हल्ला केला. त्यांनी या हल्ल्याची जबाबदारीही घेतली आहे.

लष्कराला मोठं यश, दहशतवादी संघटनेच्या टॉप कमांडरचा खात्मा

उत्तर-काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात हंदवाडाच्या चांजमुल्ला भागात शनिवारी एका घरात लपलेल्या काही दहशतवाद्यांनी नागरिकांना बंधक बनवले होते. मिळेलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या एका तुकडीने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने या भागाला घेरले आणि सर्व नागरिकांना सोडवले. जेव्हा बंधक नागरिकांना सोडवण्यात येत होते. तेव्हाच दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार केला. यानंतर लष्करानेही प्रत्युत्तर दिले. यात लष्कराचे अधिकारी कर्नल आशुतोष शर्मा आणि मेजर अनूज यांच्यासह दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीसचे उपनिरीक्षक शकील काझी यांना हौतात्म्य आले.

कर्नल आशुतोष यांनी यापूर्वी अनेक मोहिमा केल्या होत्या यशस्वी - 
चांजमुल्ला भागात शनिवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक कर्नल, एक मेजर, लष्कराचे दोन जवान आणि एक पोलीस उपनिरीक्षकाला हौतात्म्य आले. यातील कर्नल आशुतोष शर्मा यांनी यापूर्वी दहशतवाद्यांविरोधातील अनेक कारवाया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. मात्र, या कारवाईत त्यांना हौतात्म्य आले.

CoronaVirus News: कोरोना जाणार नाही, त्याच्यासोबतच जगणं शिकावं लागेल, केजरीवालांनी सांगितला अॅक्शन प्लॅन  

गेल्या दोन दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांनी जोर धरला आहे. याशिवाय पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला जात आहे. यापूर्वी पुलवामाच्या डांगरपोरामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी सर्च ऑपरेशनदरम्यान तेथे लपून असलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

रशियानं तयार केला 'महाबॉम्ब', एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं संपूर्ण जग

Web Title: new militants outfit trf the resistance front took responsibility of handwara encounter sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.