शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीवर ‘राष्ट्रीय’ मान्यतेचे संकट

By admin | Updated: October 22, 2014 13:12 IST

राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून असलेली मान्यता टिकवून ठेवण्यासाठी किमान आवश्यक जनाधाराच्या निकषांची पूर्तता लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकांमध्येही करू न शकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर ‘राष्ट्रीय’ मान्यता गमावण्याची टांगती तलवार आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून असलेली मान्यता टिकवून ठेवण्यासाठी किमान आवश्यक जनाधाराच्या निकषांची पूर्तता लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकांमध्येही करू न शकल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष आणि भारतीय कम्युन्सिट पक्ष या तीन पक्षांवर ‘राष्ट्रीय’ मान्यता गमावण्याची टांगती तलवार अजूनही कायम आहे.या पक्षांंची मान्यता गेली तर देशात राष्ट्रीय म्हणून मान्यता असलेले भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) हे केवळ तीनच पक्ष राहतील. स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात कमी संख्या असेल. याआधी १९५७ मध्ये राष्ट्रीय पक्षांची संख्या चारवर आली होती.खरे तर एप्रिल-मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते लक्षात घेऊन तुमची राष्ट्रीय पक्षाची मान्यता का काढून घेऊ नये, अशी नोटीस निवडणूक आयोगाने या तिन्ही पक्षांना गेल्या आॅगस्टमध्येच दिली होती. त्यावेळी पुढील काही महिन्यांत महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित होते. त्यामुळे या विधानसभा निवडणुकांमधील कामगिरी पाहून नंतर निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यावेळी राष्ट्रवादीतर्फे प्रफुल्ल पटेल व कम्युनिस्ट पक्षातर्फे डी. राजा या ज्येष्ठ नेत्यांनी आयोगापुढे मांडली होती.आता महाराष्ट्र व हरियाणा विधानसभेच्या निवडणुका उरकल्या आहेत व झारखंड आणि जम्मू-काश्मीरची निवडणूक डिसेंबरपूर्वी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे झालेल्या दोन राज्यांमधील निवडणुकीच्या आधारे आयोगाकडून या तीन पक्षांच्या राष्ट्रीय मान्यतेचा पाठपुरावा पुन्हा केला जाणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविणे किंवा टिकविण्यासाठी कोणाही राजकीय पक्षाने ताज्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान दोन टक्के जागा (११ जागा) जिंकणे आवश्यक असते. किंवा त्या पक्षाने लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये किमान चार राज्यांमध्ये एकूण मतदानाच्या सहा टक्के मते मिळविण्याबरोबरच लोकसभेच्या चार जागा जिंकणे हा दुसरा निकष आहे.