शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 13:01 IST

Navjot Singh : भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील डेप्युटी सेक्रेटरी नवजोत सिंग यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाने गंभीर आरोप केले आहेत.

दिल्लीच्या धौला कुआन परिसरात झालेल्या बीएमडब्ल्यू अपघाताने राजधानी हादरली आहे. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील डेप्युटी सेक्रेटरी नवजोत सिंग यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाने गंभीर आरोप केले आहेत. नवजोत यांचा मुलगा नवनूर सिंग याने दिलेल्या माहितीनुसार, "अपघातानंतर त्याच्या वडिलांना मोठ्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल किंवा एम्ससारख्या ठिकाणी नेण्याऐवजी त्यांना २० किमी अंतरावर असलेल्या खालगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या. पालकांना रुग्णवाहिकेऐवजी डिलिव्हरी व्हॅनने नेण्यात आलं आणि योग्य उपचारांअभावी वडिलांचा मृत्यू झाला."

"आई-वडील गुरुद्वारा बंगला साहिब येथे जात होते, परंतु आई फोन उचलत नव्हती. यानंतर एका नातेवाईकाचा फोन आला, ज्याने सांगितलं की, पालकांचा भीषण अपघात झाला आहे आणि दोघांनाही उपचारासाठी जीटीबी नगरमधील न्यू लाईफ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दुपारी १ ते १:३० च्या दरम्यान बीएमडब्ल्यू कार चालवणाऱ्या एका तरुणीने पालकांच्या बाईकला धडक दिल्याने हा अपघात झाला."

हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?

नवनूरने सांगितलं की, "वडिलांना अपघातस्थळापासून २० किमी अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं आणि तिथे पुरेशा सुविधा किंवा आपत्कालीन व्यवस्था नव्हती. धौला कुआन परिसरात अनेक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि एम्स आहे, जर वडिलांना वेळेवर तिथे नेण्यात आलं असतं तर कदाचित माझ्या वडिलांचा जीव वाचला असता."

कुटुंबाने असाही आरोप केला आहे की, जखमींना रुग्णवाहिकेऐवजी डिलिव्हरी व्हॅनने रुग्णालयात नेण्यात आलं. जेव्हा नवजोत सिंग यांची पत्नी आई शुद्धीवर आली तेव्हा त्या व्हॅनच्या सीटवर होती आणि पती मागे बेशुद्ध अवस्थेत होते. रुग्णालयात पोहोचल्यानंतर नवजोत यांना मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू आहे. अपघातात सहभागी असलेली बीएमडब्ल्यू जप्त करण्यात आली आहे आणि अधिक चौकशी केली जात आहे.

टॅग्स :delhiदिल्लीAccidentअपघातDeathमृत्यू