शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महत्वाचे-आतील पान

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

मणिपुरात बॉम्बस्फोटात सात जखमी

मणिपुरात बॉम्बस्फोटात सात जखमी
इम्फाल- मणिपूरच्या मुख्य बाजार परिसरात बुधवारी सायंकाळी झालेल्या एका बॉम्बस्फोटात चार पोलीस कर्मचाऱ्यांसह सात जण जखमी झाले. बॉम्ब पेरला असल्याची सूचना पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने तपास केला असता एक संशयास्पद बॅग मिळाली. शिपायाने ती बॅग नांबुल नदीत फेकण्याचा प्रयत्न केला असता स्फोट झाला.
नक्षल हल्ल्यात जवान शहीद
रायपूर- छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्यात गादीरास पोलीस स्टेशनअंतर्गत दूधीरास गावाशेजारील जंगलात नक्षल्यांनी गुरुवारी पोलीस दलावर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, हे पोलीस दल गस्त घालण्यासाठी रवाना झाले होते. पोलिसांनी प्रत्युत्तरात कारवाई केल्यानंतर नक्षल्यांनी घटनास्थळावून पळ काढला. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
खोऱ्यात पाऊसधारा आणि बर्फवृष्टी
श्रीनगर- काश्मीरमध्ये पर्यटकांचे आवडीचे ठिकाण असलेल्या प्रसिद्ध गुलमर्ग आणि पहलगाममध्ये गुरुवारी पुन्हा बर्फवृष्टी झाली तर खोऱ्याच्या इतर भागात सतत चौथ्या दिवशी पाऊस सुरूच होता. हवामान खात्याने पुढील आठवड्यापर्यत असेच वातावरण राहील,असा अंदाज वर्तविला आहे.
बसपा सदस्यांचे उत्तर प्रदेश विधानसभेतून बहिर्गमन
लखनौ- उत्तर प्रदेशातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्यावर प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून चर्चा घेतली जावी या मागणीवरून बहुजन समाज पार्टीच्या सदस्यांनी गुरुवारी विधानसभेत सभात्याग केला. सभागृहाचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्ष नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी उपरोक्त मागणी केली होती.
स्वामी अग्निवेश यांची रेल्वे अपघातप्रकरणी मागणी
नवी दिल्ली- सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी देशातील रेल्वेच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करुन विविध रेल्वे अपघातांचे चौकशी अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांच्या नावे खुल्या पत्रात त्यांनी वाढत्या रेल्वे अपघातांकडे लक्ष वेधले आहे.
पंतप्रधानांच्या अरुणाचल दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त
इटानगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेशच्या २९ व्या स्थापना दिनानिमत्त आयोजित समारंभात सहभागी होण्यासाठी शुक्रवारी राज्याच्या दौऱ्यावर येत असून त्याअनुषंगाने सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
केजरीवालांच्या जनता दरबारात अपंगांच्या समस्यांचा उहापोह
गाझियाबाद- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी त्यांच्या जनता दरबारात विकलांग नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
श्रीलंकेच्या नौदलाने नावेतील उपकरणे केली नष्ट
रामेश्वरम(तामिळनाडू)- श्रीलंकेच्या नौदलाने गुरुवारी मन्नारच्या खोऱ्यात एका नावेतील जीपीएस आणि मासोळ्यांचा शोध घेणारे उपकरण गुरुवारी नष्ट केले. या नावेत सहा कोळी होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री उशिरा रामेश्वरममधून रवाना होणाऱ्या ३,००० लोकांच्या समूहात या कोळ्यांचा समावेश होता.
सौर यंत्राची तोडफोड करणाऱ्या तिघांना अटक
जैसलमेर- जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण पोलीस स्टेशनअंतर्गत एका सौर यंत्राची तोडफोड आणि हवेत गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना गुरुवारी अटक केली. पोलीस उपअधिक्षक धीमाराम बिश्नोई यांनी ही माहिती दिली.