शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:56 IST

"मला, माझ्या मुलाला भेटण्यासाठी आत जायचे आहे...!"

गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनच्या दिशेने झेपावलेले एअर इंडियाचे विमान (AI-171) अवघ्या 5 मिनिटांत कोसळले. या विमानात 242 प्रवासी होते, यात अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश होता. धावपट्टीवरून उड्डाण करताच हे विमान विमानतळाजवळील बीजे मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळले. दरम्यान, आपला मुलगा लंच ब्रेकवर याच वस्तिगृहात गेला होता. दुर्घटना घडली तेव्हा त्याने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. तो सुरक्षित आहे, असे रमीला बेन नावाच्या एका महिलेने म्हटले आहे.

"मला माझ्या मुलाला आत जाऊन भेटायचे आहे..." -एएनआय (ANI) सोबत बोलताना रमीला बेन यांनी सांगितले की, "विमान वस्तिगृहावरच कोसळले. माझ्यामुलाला काहीही झाले नाही. माझे त्याच्यासोबत बोलणे झाले आहे. मला, माझ्या मुलाला भेटण्यासाठी आत जायचे आहे. मुलगा सांगतोय की, आपण बरे आहोत. दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्याने थोडी दुखापत झाली आहे. मी आत गेले की नेमके काय झाले ते कळेल."

विमानात कोणत्या देशाचे किती प्रवासी? - या घटनेनंतर एअर इंडियाचे निवेदनही समोर आले आहे. यात क्रॅश झालेल्या विमानात उपस्थित असलेल्या प्रवाशांसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या विमानात 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनडाई नागरिक तर 7 पोर्तगालचे नागरिक बसलेले होते.  

बोइंग 787-8 ड्रीमलाइनर विमान -अहमदाबादहून दुपारी 1:38 वाजता निघालेले हे विमान बोईंग 787-8 ड्रीमलाइनर (VT-ANB) विमान होते. जे अहमदाबाद एयरपोर्टच्या रनवे 23 वरून टेकऑफ करत होते. टेकऑफनंतर लगेचच विमानाने ATC ला ‘मेडे’ कॉल केला. मात्र यानंतर विमानाचा संपर्क तुटला. यानंतर ही दुर्घटना घडली.

 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाGujaratगुजरातdoctorडॉक्टरAir Indiaएअर इंडिया