शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यापालांचा पुन्हा ब्रेक?
2
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
3
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
4
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
5
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
6
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
7
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
8
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
9
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
10
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
11
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
12
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
13
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
14
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
15
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
16
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
17
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
18
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
19
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
20
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

ईस्टर्नसाठी मस्ट -

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

हायकोर्टाचा ठपका : न्यायालयीन मित्राने उघडला खोटेपणानागपूर : रस्ते विकासाकरिता कापलेल्या झाडांच्या मोबदल्यात करावयाच्या वृक्षारोपणासंदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची भूमिका अप्रामाणिक आहे, असा ठपका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ठेवला.वृक्षारोपणासंदर्भात प्राधिकरण गंभीर नसल्याची बाब गेल्या काही महिन्यांतील अनुभवावरून न्यायालयाच्या निदर्शनास आली आहे. यामुळे न्यायालयाने प्राधिकरणच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले ...

हायकोर्टाचा ठपका : न्यायालयीन मित्राने उघडला खोटेपणा
नागपूर : रस्ते विकासाकरिता कापलेल्या झाडांच्या मोबदल्यात करावयाच्या वृक्षारोपणासंदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची भूमिका अप्रामाणिक आहे, असा ठपका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ठेवला.
वृक्षारोपणासंदर्भात प्राधिकरण गंभीर नसल्याची बाब गेल्या काही महिन्यांतील अनुभवावरून न्यायालयाच्या निदर्शनास आली आहे. यामुळे न्यायालयाने प्राधिकरणच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यायालयाच्या निर्देशावरून महामार्ग प्राधिकरणने नागपूर-बैतूल महामार्गावरील ५२ हजार ५८१ झाडे जगल्याची माहिती दिली होती. ही बाब खरी आहे की खोटी, हे पाहण्यासाठी न्यायालयाने न्यायालयीन मित्र ॲड. एस. एस. सान्याल यांना निरीक्षणासाठी पाठविले होते. ॲड. सान्याल यांनी झाडांची पाहणी करून अहवाल सादर केला. नागपूर-बैतूलपर्यंतच्या ५६ किलोमीटर महामार्गावरील ४० टक्के झाडे आजारी व वाईट अवस्थेत असल्याची माहिती त्यांनी अहवालात देऊन महामार्ग प्राधिकरणचा खोटेपणा पुढे आणला. यावरून न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी प्राधिकरणला कडक शब्दांत फटकारून ॲड. सान्याल यांच्या अहवालावर एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. महामार्गावरील वृक्षांचे संरक्षण व वृक्ष लागवडीसाठी नेचर कन्झर्व्हेशन असोसिएशनने जनहित याचिका दाखल केली आहे.