शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

भाजप खासदारांच्या 'अशा' वागण्यामुळे पंतप्रधान मोदी नाराज; मागवली नावांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 2:46 PM

या विधेयकात सीमाशुल्क कायदा, व्यापार चिन्ह कायदा यांसह अनेक कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. विरोधकांनी विधेयक निवड समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव दिला आणि नंतर त्यावर मत मागितले. पण सभागृहाने हा प्रस्ताव 44 विरुद्ध 79 मतांनी फेटाळून लावला. सध्या राज्यसभेत भाजपचे एकूण 94 सदस्य आहेत. (Monsoon Session Of Parliament)

नवी दिल्ली - न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2021 सोमवारी राज्यसभेत मंजूर झाले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे बहुतांश खासदार अनुपस्थित होते. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नाराजी व्यक्त केली आहे. ( Monsoon Session Of Parliament PM Modi angry with bjp mps for absence in rajya sabha)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत यावर नाराजी व्यक्त केली. तसेच विधेयक मंजूर होत असताना सभागृहात जे खासदार उपस्थित नव्हते त्यांची यादी मागवली आहे. राज्यसभेत सोमवारी संक्षिप्त चर्चेनंतर विरोधकांच्या गदारोळातच 'न्यायाधिकरण सुधारणा विधेयक, 2021' मंजूर करण्यात आले.

गेल्यावर्षी ५० टक्क्यांनी वाढलं भाजपाचं उत्पन्न; काँग्रेसच्या तुलनेत ५ पट जास्त, वाचा कुठे केला खर्च?

या विधेयकात सीमाशुल्क कायदा, व्यापार चिन्ह कायदा यांसह अनेक कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. विरोधकांनी विधेयक निवड समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव दिला आणि नंतर त्यावर मत मागितले. पण सभागृहाने हा प्रस्ताव 44 विरुद्ध 79 मतांनी फेटाळून लावला. सध्या राज्यसभेत भाजपचे एकूण 94 सदस्य आहेत.

भाजपकडून खासदारांना व्हिप जारी -पावसाळी अधिवेशनाचा बराचसा कालावधी गोंधळात गेला आहे. विरोधकांची घोषणाबाजी आणि त्यानंतर तहकूब होणारं कामकाज यामुळे बहुतांश विधेयक चर्चा न करताच मंजूर झाली. यानंतर आता काही महत्त्वाची विधेयकं राज्यसभेत पारित करून घ्यायची असल्यानं सरकारनं तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच भाजपच्या राज्यसभेतील खासदारांना तीन ओळींचा व्हिप जारी करण्यात आला आहे. लोकसभेतील सर्व खासदारांना उपस्थित राहण्यासाठीदेखील भाजपनं व्हिप बजावला आहे. त्यामुळे आजचा आणि उद्याचा दिवस महत्त्वाचा असेल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदBJPभाजपाMember of parliamentखासदारRajya Sabhaराज्यसभाMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन