शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त, पण विवाहांवर कोरोनाचे सावट; मंगल कार्यालय चालवणारे व्यावसायिक अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 06:06 IST

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, गेल्या वर्षी कोरोनामुळे लग्न पुढच्या यंदा करण्याचे ठरवलेल्या कुटुंबांच्या आनंदावर विरजण पडले. एकट्या उत्तर प्रदेशात   जवळपास ३० हजार लग्ने रखडली आहेत. यावर्षी एप्रिल ते जुलै दरम्यान ३७ मुहुर्त होते.

मुंबई/ नवी दिल्ली : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला (१४ मे) यंदा विवाहाचा मुहूर्त चुकणार आहे. यंदा कर्तव्य असणाऱ्यांना दणक्यात लग्नाचा बार उडविता येणार नाही. 

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, गेल्या वर्षी कोरोनामुळे लग्न पुढच्या यंदा करण्याचे ठरवलेल्या कुटुंबांच्या आनंदावर विरजण पडले. एकट्या उत्तर प्रदेशात   जवळपास ३० हजार लग्ने रखडली आहेत. यावर्षी एप्रिल ते जुलै दरम्यान ३७ मुहुर्त होते. मेमध्ये शुभ दिवस जास्त होते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लखनौत पाच ते सहा हजार विवाह लागणार होते. त्यातील ९५ टक्के लग्ने रद्द झाली. 

१३,१५,२१,२२,२३,२६,२९,३०,३१ मे रोजी चांगली तिथी होती. जूनमध्ये १५ तर जुलैमध्ये सात मुहूर्त आहेत. जून व जुलैमध्ये नेमके काय होईल हे माहीत नसल्यामुळे नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये लग्नाचे बुकिंग आधीच फुल्ल झाले आहे. तारखांचा शोध सुरू झाला आहे. आधीच बुकिंग रद्द झाल्यामुळे सगळे पैसेही अनेकांना मिळालेले नाहीत.

  छत्तीसगडमधील बहुतेक जिल्ह्यांत लॉकडाउन असल्यामुळे तेथे आता विवाह होत नाहीत. मध्यप्रदेशमध्ये कोरोनाचा फैलाव वाढल्यामुळे मे महिन्यातील सर्व विवाह लांबणीवर गेले आहेत. उत्तराखंडमध्ये अक्षय तृतीयेला मोठ्या संख्येत लग्न होतात. परंतु, यंदा लोक लग्ने  टाळत आहेत.

बँडवाले, केटरर्स, डीजेवाल्यांनाही फटका - विवाह समारंभ साध्या पद्धतीने आणि मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत होत असल्याने मंगल कार्यालयापासून केटरर्सपर्यंत अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. मंगल कार्यालये ओस पडली आहेत. - फुले, रोषणाई, मातीची भांडी, घोडा, केटरर्सचा व्यवसाय थंडावला आहे. सोने, चांदी, दागदागिन्यांच्या खरेदीवरही मर्यादा आल्या आहेत. ना बँड, ना बाजा ना बारात अशी परिस्थिती असल्याने डीजेही धूळखात पडून आहेत. कपडेलत्ते यांची खरेदी होत असली तरी बस्ता बांधण्याचे प्रमाण कमी झाले आहे. लग्न लावणाऱ्या गुरुजींपासून ते अनेकांचे उत्पन्न बुडाले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्नCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र