शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मोदी पंतप्रधान होताच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ?

By admin | Updated: May 23, 2014 13:21 IST

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर विराजमान होताच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसण्याची दाट शक्यता आहे.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २३ - नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर विराजमान होताच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसण्याची दाट शक्यता आहे. मोदींसमोर अर्थ, खत आणि पेट्रोलियम मंत्रालय सबसिडीमध्ये कपात करण्याचा प्रस्ताव मांडणार असून हे प्रस्ताव मंजूर झाल्यास सर्वसामान्यांची महागाईतून सुटका होणे कठीणच आहे.  
पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर विविध मंत्रालय नरेंद्र मोदींसमोर प्रेझेंटेशन सादर करणार आहेत. यात पेट्रोलियम, खत मंत्रालय  सबसिडीमध्ये कपात करण्याचा प्रस्ताव मांडतील असे सूत्रांचे म्हणणे आहे. सबसिडीवरील अनावश्यक खर्च टाळून गुंतवणूकीत वाढ करता येईल असे या मंत्रालयाचे अधिकारी मोदींना निदर्शनास आणून देतील. पेट्रोलियम मंत्रायल घरगूती गॅसच्या दरांमध्ये २५० रुपयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव मांडेल असे सूत्रांचे म्हणणे आहे. याशिवाय सबसिडीने मिळणा-या सिलेंडरची संख्या घटवणे, डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्याचे प्रस्तावही या प्रेझेंटेशनमध्ये मांडण्यात येतील असे समजते.
खत मंत्रालयही खतांच्या सबसिडीमध्ये कपात करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही खात्यांच्या प्रस्तावांना अर्थ मंत्रालयानेही अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे हे सर्व प्रस्ताव मोदी मंजूर करतील का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मोदींनी हे प्रस्ताव मंजूर केल्यास सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसेल ऐवढे मात्र नक्की. 
मोदींची परीक्षा
यूपीएच्या कार्यकाळात पी. चिदंबरम यांनीही सबसिडीमध्ये कपात करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र काँग्रेस नेतृत्वाने चिदंबरम यांचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नव्हते. त्यामुळे हे सर्व प्रस्ताव यूपीएच्या कार्यकाळापासून प्रलंबित आहेत. भाजप त्यावेळी विरोधी बाकावर असल्याने त्यांनी सबसिडीमध्ये कपात करण्याच्या निर्णयांना तीव्र विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर मोदींना पंतप्रधानपदावर विराजमान होताच या कठीण परीक्षेला तोंड द्यावे लागणार आहे.