‘ब्रिक्स’ परिषदेसाठी मोदी ब्राझीलला

By Admin | Updated: July 13, 2014 02:16 IST2014-07-13T02:16:30+5:302014-07-13T02:16:30+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, रविवारी ‘ब्रिक्स’ (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अमेरिका) या पाच देशांच्या शिखर परिषदेसाठी ब्राझीलला रवाना होत आहेत़

Modi brazil for the BRICS Conference | ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी मोदी ब्राझीलला

‘ब्रिक्स’ परिषदेसाठी मोदी ब्राझीलला

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, रविवारी ‘ब्रिक्स’ (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अमेरिका) या पाच देशांच्या शिखर परिषदेसाठी ब्राझीलला रवाना होत आहेत़ 14 ते 15 जुलैदरम्यान आयोजित या परिषदेत एक विकास बँक स्थापन करण्याच्या योजनेला अंतिम रूप देण्यासह संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संघटनांमध्ये सुधारणांसाठी आवाज उठवला जाण्याची शक्यता आह़े मोदींची पाश्चिमात्य देशांतील बहुपक्षीय व्यासपीठावर ही पहिली उपस्थिती असेल़ पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर मोदी यांनी भुतानचा दौरा केला होता़ मात्र, सार्क देशांबाहेर मोदींचा हा पहिला विदेश दौरा असेल़

 

Web Title: Modi brazil for the BRICS Conference