मिथुन चक्रवर्ती यांनी दिला खासदारकीचा राजीनामा

By Admin | Updated: December 26, 2016 17:56 IST2016-12-26T17:56:29+5:302016-12-26T17:56:29+5:30

राज्यसभेवर नियुक्त असलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

Mithun Chakrabarty's resignation resigns | मिथुन चक्रवर्ती यांनी दिला खासदारकीचा राजीनामा

मिथुन चक्रवर्ती यांनी दिला खासदारकीचा राजीनामा

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 26 - राज्यसभेवर नियुक्त असलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. मिथुन चक्रवर्ती हे तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवर नियुक्त झाले होते. त्यांनी तब्येतीचे कारण पुढे  करत राजीनामा दिला आहे.  
मिथुन यांनी त्यांचे राजीनामापत्र राज्यसभेच्या सभापतींकडे सोपवल्याचे तृणमूल काँग्रेसमधील सुत्रांनी सांगितले. एप्रिल 2014 रोजी मिथुन यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती. मात्र त्यांची सभागृहातील उपस्थिती नगण्य होती. गेल्या पावणेतीन वर्षांत ते केवळ तीन दिवस संसदेत उपस्थित राहिले होते. "मिथुन यांनी प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा दिला असून, आमचे त्यांच्याशी आणि त्यांच्या परिवाराशी चांगले संबंध कायम राहतील,"  असे तृणमुलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी सांगितले.

Web Title: Mithun Chakrabarty's resignation resigns