शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

'स्मृती इराणींकडून खासदार निधीचा दुरुपयोग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 03:33 IST

काँग्रेस नेत्यांचा आरोप; राजीनाम्याची मागणी

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : खासदार निधीच्या दुरुपयोगावरून केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी वादात सापडल्या आहेत. आपल्या निकटवर्तीयांना नियम डावलून ६ कोटी रुपयांचे पेमेंट केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. हे प्रकरण २०१७ मध्ये चर्चेत आले; पण संबंधित मंत्रालयाने आणि विभागाने काही कारवाई करण्याऐवजी पूर्ण प्रकरणच बाजूला ठेवून दिले. कॅगच्या अहवालात असे म्हटले आहे की, एका मजूर कामदार को. आॅपरेटिव्ह सोसायटीला २३२ कामांचा ठेका विना टेंडर देण्यात आला. त्यासाठी ५.९४ कोटी रुपयांचा निधी दिला. याबाबतच्या पूरकपत्रात मात्र ८४.५३ लाख रुपयांचा निधी दिल्याचा उल्लेख आहे आणि तो खोटा असल्याचे सांगितले जाते.खासदार निधीबाबत स्मृती इराणी यांचा रेकॉर्ड संशयाच्या भोवऱ्यात आहे. मंत्रालयाचे रेकॉर्ड असे सांगते की, वर्ष २०१८-२०१९ मध्ये इराणी यांच्या खासदार निधीचे दोन हप्ते रोखण्यात आले आहेत. कारण, अद्याप त्यांनी निधीच्या उपयोगाचे प्रमाणपत्र दिले नाही. इराणी यांना २० जून २०१८ रोजी २.५० कोटींचा अंतिम हप्ता देण्यात आला होता. काँग्रेसचे नेते अमित चावडा यांनी इराणी यांच्यावर खासदार निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. याबाबत आरोप सुरू झाले तेव्हा इराणी यांनी १२ जुलै २०१७ रोजी आनंद जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आपल्या खासदार निधीतून झालेल्या कामांचा प्रगती अहवाला मागविला. गुजरातमधील काँग्रेसचे नेते शक्तीसिंह गोहिल यांनी हे प्रकरण पुन्हा एकदा नव्याने समोर आणले आहे.याबाबत दस्तऐवज सादर करीत शक्तीसिंह यांनी इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि सवाल केला आहे की, जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी २० जून २०१७ रोजी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाला पत्र लिहून भ्रष्टाचाराची तक्रार केली तेव्हा कारवाई का केली नाही? त्यानंतर कॅगनेही नियमांच्या उल्लंघनाबाबत भाष्य केले होते.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणी