बापरे! एलपीजी संकटामुळे दूध पुरवठा धोक्यात! डेअरी क्षेत्राला मोठा फटका; पॅकेजिंग मटेरियल देखील केवळ १० दिवस पुरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 07:58 IST2026-03-17T07:57:18+5:302026-03-17T07:58:53+5:30

LPG Crisis in Dairy Sector: गॅस टंचाईमुळे दुधाचे पाश्चरायझेशन आणि पॅकेजिंग करणे कठीण झाले आहे. गोवर्धन डेअरीच्या मते साठा केवळ १० दिवस पुरेल. वाचा सविस्तर.

Milk Supply Crisis: Oh my! Milk supply in danger due to LPG crisis! Big blow to dairy sector; Packaging material will also last only 10 days | बापरे! एलपीजी संकटामुळे दूध पुरवठा धोक्यात! डेअरी क्षेत्राला मोठा फटका; पॅकेजिंग मटेरियल देखील केवळ १० दिवस पुरणार

बापरे! एलपीजी संकटामुळे दूध पुरवठा धोक्यात! डेअरी क्षेत्राला मोठा फटका; पॅकेजिंग मटेरियल देखील केवळ १० दिवस पुरणार

होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे उद्भवलेल्या एलपीजी तुटवड्याची झळ आता थेट डेअरी क्षेत्राला बसू लागली आहे. दूध सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्याच्या पॅकेजिंगसाठी मोठ्या प्रमाणावर गॅसची आवश्यकता असते, मात्र पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे देशातील डेअरी उद्योग सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे.

दूध दीर्घकाळ टिकवण्यासाठी ते ठराविक तापमानावर गरम करून पाश्चरायझेशन करावे लागते, ज्यासाठी मोठ्या प्रमाणावर गॅस लागतो. दुधाच्या प्लास्टिक पिशव्या आणि कार्टन्स तयार करण्यासाठीही गॅसची गरज असते. गॅस अभावी कंपन्यांना नवीन पॅकेजिंग मटेरियल तयार करणे कठीण जात आहे. गोवर्धन डेअरीचे संस्थापक देवेंद्र शाह यांनी सांगितले की, त्यांच्याकडे पॅकेजिंग साहित्याचा साठा केवळ १० दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे.

पुरवठा साखळीवर परिणाम
जर हे संकट लवकर संपले नाही, तर दुधाचे पॅकेजिंग आणि वितरण पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गॅस संकटामुळे विशेषतः पॅकेटबंद दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, यामुळे शहरांमधील दूध पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. अनेक मोठ्या डेअरी ब्रँड्सनी इशारा दिला आहे की, जर पुढील १० दिवसांत गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही, तर बाजारात पॅकेटबंद दुधाची टंचाई निर्माण होऊ शकते.

होर्मुझ पेचाचा परिणाम
भारताची ८५-९०% एलपीजी आयात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हा मार्ग विस्कळीत झाला आहे. जरी 'शिवालिक' आणि 'नंदादेवी' सारखी जहाजे भारतात पोहोचली असली, तरी ती देशाची केवळ सव्वा दिवसाची गरज पूर्ण करू शकतात. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला, विशेषतः डेअरी उद्योगाला गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत.

Web Title : एलपीजी संकट से दूध आपूर्ति खतरे में; डेयरी उद्योग को भारी नुकसान

Web Summary : होरमुज जलडमरूमध्य तनाव से एलपीजी की कमी से डेयरी क्षेत्र प्रभावित। पाश्चराइजेशन और पैकेजिंग के लिए गैस महत्वपूर्ण है। आपूर्ति केवल 10 दिनों तक चल सकती है, जिससे दूध वितरण में व्यवधान और शहरों में संभावित कमी का खतरा है।

Web Title : LPG Crisis Threatens Milk Supply; Dairy Sector Faces Major Blow

Web Summary : LPG shortage due to Hormuz Strait tensions impacts dairy sector. Gas is vital for pasteurization and packaging. Supplies may last only 10 days, risking disruptions in milk distribution and potential shortages in cities if the crisis persists.