मिशेल यांना रेशमी साडी

By Admin | Updated: January 26, 2015 04:35 IST2015-01-26T04:35:49+5:302015-01-26T04:35:49+5:30

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांना भारतीयांकडून वेगवेगळ्या साड्यांची भेट दिली जाणार आहे.

Michelle has silk sarees | मिशेल यांना रेशमी साडी

मिशेल यांना रेशमी साडी

नवी दिल्ली : अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांना भारतीयांकडून वेगवेगळ्या साड्यांची भेट दिली जाणार आहे. तेलंगणातील सिरसिला गावातील एका २७वर्षीय विणकराने मिशेल ओबामा यांना देण्यासाठी अतिशय सुंदर अशी साडी विणली आहे. नल्ला विजय असे या विणकराचे नाव असून, त्याने मिशेल यांच्यासाठी साडी तर ओबामा यांच्यासाठी रेशमी स्कार्फ विणला आहे. या साडी व स्कार्फचे रेशीम इतके मुलायम आहे की त्यांची घडी काड्यांच्या पेटीत बसू शकते. साडी साडेचार मीटर असून, वजन ६० ग्रॅम आहे, तर स्कार्फ २ मीटरचा असून, वजन ३० ग्रॅम आहे. या दोन्ही वस्तू केंद्रीय मंत्री बंदारू दत्तात्रय यांच्याकडे देण्यात आल्या आहे.

 

Web Title: Michelle has silk sarees