शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगात महाराष्ट्रात एससी कुटुंबांना फक्त ९.८७ टक्के रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 23:32 IST

महाराष्ट्रात फक्त ९.८७ टक्के एससी आणि २७.४७ टक्के एसटी कुटुंबांनीच या योजनेत काम केले.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : दरवर्षी किमान १०० दिवस रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) सामाजिक, आर्थिकदृष्ट्या दुबळ्या असलेल्या अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातीच्या (एसटी) लोकांना कमी संधी मिळत आहे.

योजनेअंतर्गत काम करण्यांमध्ये एससी श्रेणीत २०.९९ टक्के, एसटीचे १८.७८ टक्के कुटुंबे होती तर सर्वात जास्त ६०.२२ टक्के कुटुंबे ही गैर एससी-एसटी श्रेणीतील होती. महाराष्ट्रात फक्त ९.८७ टक्के एससी आणि २७.४७ टक्के एसटी कुटुंबांनीच या योजनेत काम केले.२८ मे रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात मनरेगात काम करणारी २.०७ कोटी कुटुंबांपैकी १.२४ टक्के गैर एससी-एसटी श्रेणीतील आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कुटुंबाची संख्या अनुक्रमे ४३.५१ लाख आणि ३८.९२ लाख होती.

ग्रामीण विकास मंत्रालय राबवत असलेल्या या योजनेत ज्या राज्यांत गैर एससी-एसटी श्रेणीतील कुटुंबांचे प्रतिनिधित्व जास्त होते त्यात बिहार (८४.९६ टक्के), आसाम (८०.५३ टक्के), उत्तराखंड (८०.०६ टक्के), केरळ (७५.९० टक्के), जम्मू-कश्मीर (७३.८७ टक्के) आणि कर्नाटकचा (७२.११ टक्के) समावेश आहे. संख्येचा विचार केला तर आंध्र प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त २१.१४ लाख गैर एससी/एसटी कुटुंबांनी मनरेगात काम केले.

लॉकडाउन दरम्यान सुरू झालेल्या आर्थिक वर्षात आतापर्यंत महाराष्ट्रात मनरेगाअंतर्गत एकूण ५.०१ लाख कुटुंबांनी मनरेगात काम केले. त्यात ३.१४ लाख (६२.६५ टक्के) गैर एससी/एसटी श्रेणीतील होते. राज्यात एससी श्रेणीतील ४९,४९६ (९.८७ टक्के) आणि एसटीचे १.३७ लाख (२७.४७ टक्के) कुटुंबांचा समावेश होता.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार