शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वेला मिळाली गती -१

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

मेट्रो रेल्वेला मिळाली गती प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन : प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्याचा मुख्यमंत्र्यांना विश्वास नागपूर : नागपुरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्प हा लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन गुरुवारी दुपारी मौजा लेंड्रा दीक्षाभूमीसमोर येथे मुख्यमंत्री ...


मेट्रो रेल्वेला मिळाली गती

प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन : प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्याचा मुख्यमंत्र्यांना विश्वास

नागपूर :
नागपुरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्प हा लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन गुरुवारी दुपारी मौजा लेंड्रा दीक्षाभूमीसमोर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी अध्यक्षस्थानी होते. भूमिपूजनानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याची शासन कटिबद्ध आहे. मूळ ८६८० कोटी रुपयाचा हा प्रकल्प १० हजार कोटी रुपयांवर जाण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखविली. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन हे तिघेही मिळून हा प्रकल्प पूर्ण करणार आहेत. त्यासाठी शासनाने एसपीव्हीची स्थापना केली आहे. दीक्षित नावाचे रेल्वेचे अधिकारी यांची नियुक्तीसुद्धा करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी काही जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे. परंतु जी जागा खाली आहे, त्यावर कामाला तातडीने सुरुवात केली जाईल आणि सोबतच जमीन अधिग्रहणाचेही काम सुरू राहील. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प व महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करून राज्य शासनाने ३० जानेवारी २०१४ रोजी आणि केंद्र शासनाने २१ ऑगस्ट २०१४ रोजी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पास मंजुरी प्रदान केली आहे. मेट्रो प्रकल्प हा सन २०१८ पर्यंत कार्यान्वित करावयाचा आहे.
नागपूर सुधार प्रन्यासतर्फे आयोजित या भूमिपूजन सोहळ्यास महापौर प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोरकर, नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त डॉ. रवींद्र भोयर, मनपा आयुक्त श्याम वर्धने, नासुप्रचे सभापती डॉ. हर्षदीप कांबळे, अधीक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार प्रामुख्याने उपस्थित होते.