सोनिया गांधींकडून मेहबुबा यांचे सांत्वन

By Admin | Updated: January 11, 2016 02:51 IST2016-01-11T02:51:47+5:302016-01-11T02:51:47+5:30

काँगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रविवारी येथे पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांची भेट घेत, त्यांचे सांत्वन केले.

Mehbooba's consolation from Sonia Gandhi | सोनिया गांधींकडून मेहबुबा यांचे सांत्वन

सोनिया गांधींकडून मेहबुबा यांचे सांत्वन

श्रीनगर : काँगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रविवारी येथे पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांची भेट घेत, त्यांचे सांत्वन केले. मेहबुबा यांचे पिता आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनावर सोनियांनी तीव्र शोक व्यक्त केला. दरम्यान, या भेटीस राजकीयदृष्ट्याही महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
दुपारी ३ वाजता सोनिया गांधी दिल्लीहून श्रीनगर विमानतळावर पोहोचल्या आणि तेथून थेट गुपकर येथील मेहबुबा यांच्या निवासस्थानी गेल्या. याठिकाणी सुमारे २० मिनिटे त्यांनी मेहबुबांशी चर्चा केली. यावेळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, काँग्रेस सरचिटणीस अंबिका सोनी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जी.ए. मीर आणि पक्षनेते सैफुद्दीन सोज त्यांच्यासोबत होते.
गडकरींनीही घेतली भेट
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीही मेहबुबा मुफ्ती यांची प्रत्यक्ष भेट घेत, त्यांच्या पित्याच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला.

Web Title: Mehbooba's consolation from Sonia Gandhi