शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

२४ कोचची स्लीपर वंदे भारत ट्रेन सेवेत येणार? प्रवाशांसाठी मोठी योजना; रेल्वेची जुळवाजुळव सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 17:31 IST

24 Coach Sleeper Vande Bharat Train: स्लीपर वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

24 Coach Sleeper Vande Bharat Train: आताच्या घडीला चेअर कार वंदे भारत ट्रेन आणि वंदे भारत स्लीपर ट्रेन यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वंदे भारत ट्रेन ही भारतीय रेल्वेची एक प्रिमियम ट्रेन असून, लोकप्रियतेच्या शिखरावर ही ट्रेन आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू होऊन अवघे काही दिवस झाले असले, तरी याचा १०० टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रवाशांचा फिडबॅक पाहून भारतीय रेल्वे वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये बदल करणार असल्याचेही म्हटले जात आहे. यातच आता प्रवाशांना आणखी चांगली सेवा मिळावी तसेच अधिकाधिक तिकिटे उपलब्ध असावीत, यासाठी भारतीय रेल्वे २४ कोचच्या स्लीपर वंदे भारत ट्रेनबाबत तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे. 

काही रिपोर्ट्सनुसार, आगामी काळात वंदे भारत स्लीपर ट्रेन २४ कोचची करण्याबाबत रेल्वे गांभीर्याने विचार करत आहे. याबाबत तयारी सुरू केल्याचा दावा केला जात आहे. भारतीय रेल्वे स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या कोचची संख्या वाढवण्याबाबत जुळवाजुळव करत असल्याचे म्हटले जात आहे. वंदे भारत या ट्रेन प्रकारात प्रथमच २४ कोच जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आताच्या घडीला स्लीपर वंदे भारत ट्रेन १६ कोचसह धावतात. २४ कोचची वंदे भारत स्लीपर प्रवाशांच्या सेवेत आल्यावर सीटची संख्याही वाढणार आहे. 

२४ कोचच्या स्लीपर वंदे भारत ट्रेनची रचना कशी असू शकेल?

१६ कोचच्या वंदे भारत ट्रेनमध्ये एकूण ८२३ बर्थ आहेत. तथापि, २४ कोचच्या वंदे भारत ट्रेनमध्ये १,२२४ बर्थ असतील. यामुळे बर्थची संख्या एक तृतीयांश वाढेल. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे २४ कोचची ही ट्रेन तयार केली जाईल. नुकत्याच लोकार्पण झालेल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचा ऑक्युपन्सी रेट १०० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. म्हणूनच रेल्वेने जास्त क्षमतेची ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आणण्याची योजना आखल्याचे म्हटले जात आहे. भारतीय रेल्वे २४ कोचच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे डिझाइन तयार करत आहे. पहिली प्रोटोटाइप ट्रेन २०२६ च्या अखेरीस तयार होण्याची अपेक्षा आहे. २४ कोचच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये १७ एसी ३ टियर कोच, ५ एसी २ टियर कोच, १ एसी फर्स्ट क्लास कोच, १ एसी पेंट्री कार, अशी रचना असू शकेल.

२४ कोचच्या स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये कोणत्या सुविधा मिळू शकतील?

२४ कोचची स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये आरामदायी बर्थ, रिडिंग लाइट्स, मोबाइल-लॅपटॉप चार्जिंग पॉइंट्स, वाय-फाय, माहिती आणि मनोरंजन व्यवस्था, व्हॅक्यूम टॉयलेट, अधिक सामानाची जागा, आधुनिक इंटेरिअर, तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष टॉयलेट्स आणि रॅम्प असू शकतील. सध्या चेअर कार वंदे भारत ट्रेनमध्ये ८, १६ आणि २० कोच आहेत. तर पहिली वंदे भारत ट्रेन १६ कोचसह धावते. तथापि, पहिल्यांदाच वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये २४ कोच असू शकतील. या वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रगत, अत्याधुनिक इंजिन आणि नियंत्रण प्रणाली, रिजनरेटिव ब्रेकिंगद्वारे वीज बचत होऊ शकेल. तसेच या ट्रेनचा कमाल वेग १६० किमी प्रतितास असू शकेल.

दरम्यान, आताच्या घडीला स्लीपर वंदे भारत ट्रेनचे दोन रेक पूर्ण तयार आहेत. त्यापैकी पहिला रेक कोलकाता ते कामाख्या या दरम्यान प्रवाशांच्या सेवेत आला आहे. तर दुसऱ्या रेकच्या सर्व चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. भारतीय रेल्वे २६० वंदे भारत स्लीपर ट्रेन बनवण्याची योजना आखत आहे. तसेच पुढील सहा महिन्यांत आणखी ८ वंदे भारत स्लीपर ट्रेन येतील, तर वर्षभरात एकूण १२ ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. भारतीय रेल्वे २०० हून अधिक वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा रोडमॅप तयार करत आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Indian Railways Plans 24-Coach Sleeper Vande Bharat Train Service Soon

Web Summary : Indian Railways is considering 24-coach Sleeper Vande Bharat trains due to high demand. These trains will have 1,224 berths, improved amenities, and a 160 kmph speed. The first prototype is expected by late 2026, enhancing passenger capacity and comfort.
टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीrailwayरेल्वेpassengerप्रवासीTravel Tipsट्रॅव्हल टिप्स