शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कार्य समितीची उद्या बैठक

By admin | Updated: January 12, 2015 00:39 IST

लोकसभा व अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँगे्रसमध्ये नवा प्राण फुंकण्याच्या प्रयत्नांतर्गत येत्या मंगळवारी काँग्रेस कार्यसमितीची (सीडब्ल्यूसी) बैठक होत आहे़

नवी दिल्ली : लोकसभा व अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँगे्रसमध्ये नवा प्राण फुंकण्याच्या प्रयत्नांतर्गत येत्या मंगळवारी काँग्रेस कार्यसमितीची (सीडब्ल्यूसी) बैठक होत आहे़ या बैठकीत पक्षाला गतवैभव परत मिळविण्याच्या उपाययोजनांवर चर्चा होणे अपेक्षित आहे़या बैठकीत वादग्रस्त भूसंपादन वटहुकमासारख्या अनेक मुद्यांवर मोदी सरकारला घेरण्यासाठी एक कृती योजना तयार केली जाण्याची शक्यता आहे़ काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल़ शेतकऱ्यांचा पाठिंबा पुन्हा मिळविण्यासाठी भूसंपादन वटहुकमाचा मुद्दा एक नामी संधी असल्याचे काँग्रेस मानत आहे़ अशा स्थितीत ही बैठक होत आहे़ लोकसभा आणि पाठोपाठ अनेक राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील पराभवाच्या मालिकेनंतर पक्षाचा जनाधार घसरू लागला आहे़ हे नैराश्य दूर सारून पक्षाला गतवैभव परत मिळवून देण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेण्याचे निर्देश पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांनी सर्व प्रदेशाध्यक्षांना दिले आहेत़ या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे़ गतवर्षी मे महिन्यात लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरची काँग्रेस कार्य समितीची तशी दुसरी बैठक आहे़ यापूर्वी कार्यसमितीच्या एक-दोन बैठका झाल्या होत्या; मात्र त्या ए़ आऱ अंतुले तसेच अन्य काही पक्षनेत्यांच्या निधनावर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी बोलाविण्यात आल्या होत्या़ (लोकमत न्यूज नेटवर्क)