शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा कर्मचारी उपोषणप्रश्नी मंगळवारी मंत्रालयात बैठक

By admin | Updated: March 1, 2015 23:11 IST

पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच : प्रकृती बिघडल्याने सतरा आंदोलक रुग्णालयात

पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच : प्रकृती बिघडल्याने सतरा आंदोलक रुग्णालयातनाशिक : आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमधील तासिका मानधन कर्मचारी व कंत्राटी शिक्षण कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवार (दि़२५) सुरू करण्यात आलेले आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच होते़ यातील सतरा आंदोलकांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, शासनाने आंदोलनाची दखल घेतली असून, मंगळवारी मंत्रालयात आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चेसाठी बोलविण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्ते संदीप भाबड यांनी दिली़आदिवासी विकास विभागाच्या दुर्गम भागातील शासकीय आश्रमशाळेत तुटपुंज्या मानधनावर काम करणारे हे कंत्राटी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत़ सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी त्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले असून, रविवारी पावसातही त्यांचे आंदोलन सुरूच होते़ या आंदोलनास पाच दिवस उलटून गेले असून, २३ आंदोलकांची प्रकृती बिघडली, तर यातील सतरा आंदोलकांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे़दरम्यान, मंगळवारी मंत्रालयात आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात येणार आहे़ या शिष्टमंडळातील संदीप भाबड, पंडित भाबड, रितेश ठाकूर, एस़ पी़ गावित, बबिता पाडवी, कमलाकर पाटील, केशव ठाकरे यांचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)--कोट--मंत्रालयात मंगळवारी चर्चादुर्गम भागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये तुटपुंज्या मानधनावर काम करणारे आम्ही कंत्राटी कर्मचारी असून, पहिल्या दिवसापासून काम करणार्‍या सर्वांना सेवेत घेण्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत़ यासाठी मंगळवारी आमच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलविण्यात आले आहे़- संदीप भाबड, आंदोलक़--इन्फो--उपोषणकर्ते रुग्णालयातकांताबाई धांडे, जमुनाबाई सीताराम, कुंडलीक गोडे, जगदीश शेलेकर, जगन दारिंबे, धनसिंग वसावे, विजय खरात, रमेश कुडसेम, मुकेश पटेल, सजन चव्हाण, अशोक पोटेकर, आशाबाई पावरा, जिभाऊ कुवर, श्यामराव चौधरी, भास्कर पाटील, सुधाकर भोयर, रमेश पराड या आंदोलकांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़फोटो:- ०१ पीएचएमआर १०६सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी आदिवासी विकास भवनमध्ये उपोषणासाठी बसलेले शासकीय आश्रमशाळांमधील तासिका मानधन कर्मचारी व कंत्राटी शिक्षण कर्मचारी़