सामूहिक हत्याकांडाने लखनौ हादरले, आपल्याच कुटुंबातील 6 जणांची हत्या करून आरोपी पोहोचला पोलीस ठाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 12:15 AM2020-05-01T00:15:45+5:302020-05-01T00:30:40+5:30

अजय सिंह, असे संबंधित आरोपीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त सुजीत पांडेय घटना स्थळी पोहोचले. ही घटना लखनौ-उन्नाव जिल्ह्याच्या सीमेजवळ घडल्याचे त्यांनी सांगितले. आरोपीने सर्वप्रथम उन्नाव जिल्ह्यातील लखनौला लागून असलेल्या भागात आपल्या वडिलांची हत्या केली.

mass murder in lucknow accused surrendered in police station sna | सामूहिक हत्याकांडाने लखनौ हादरले, आपल्याच कुटुंबातील 6 जणांची हत्या करून आरोपी पोहोचला पोलीस ठाण्यात

सामूहिक हत्याकांडाने लखनौ हादरले, आपल्याच कुटुंबातील 6 जणांची हत्या करून आरोपी पोहोचला पोलीस ठाण्यात

googlenewsNext
ठळक मुद्देविकलेल्या संपत्तीतून आलेल्या पैशांमध्ये आरोपी वाटा मागत होताआरोपीने सर्वप्रथम उन्नाव जिल्ह्यातील लखनौला लागून असलेल्या भागात आपल्या वडिलांची हत्या केलीपोलिसांनी आरोपीचा मुलगा अवनीश उर्फ अंकितलाही अटक केली आहे

लखनौ : लॉकडाउन सुरू असतानाच उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ सामूहिक हत्याकांडाने हादरली आही. येथील बंथरा भागात एका युवकाने आपल्याच कुटुंबातील 6 जणांची हत्त्या केली. यानंतर तो स्वतःच पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याला अटक करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

अजय सिंह, असे संबंधित आरोपीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त सुजीत पांडेय घटना स्थळी पोहोचले. ही घटना लखनौ-उन्नाव जिल्ह्याच्या सीमेजवळ घडल्याचे त्यांनी सांगितले. आरोपीने सर्वप्रथम उन्नाव जिल्ह्यातील लखनौला लागून असलेल्या भागात आपल्या वडिलांची हत्या केली. नंतर त्याने लखनौ येथील बंथरा येथे आपली आई, भाऊ, भावाची बायको आणि त्याच्या दोन मुलांचीही हत्या केली. यानंर आरोपीने स्वतःच पोलीस ठाण्यात येऊन आत्मसमर्पण केले. पांडेय म्हणाले, आरोपीने हे हत्याकांड कशामुळे केले, यासंदर्भात चौकशी सुरू आहे. 

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात; राज्यपालांनी पाठवलं पत्र

मालमत्तेवरून सुरू होता वाद -
बंथरा गुदौली गावात शेतकरी अमर सिंह आपल्या  कुटुंबासोबत राहत होते. त्यांनी जवळपास 20 वर्षांपूर्वीच मोठा मुलगा अजय सिंह याला कुटुंबापासून वेगळे केले होते. अमर सिंह यांच्यासह त्यांची पत्नी, एक मुलगा अरुण, सून रामसखी, नातू सौरभ आणि नात सारिका राहत होते. अनेक दिवसांपासून या पिता-पुत्रांमध्ये मालमत्तेचा वाद सुरू होता. आरोपी अजयचा गुरुवारीही वडील अमर सिंह आणि भाऊ अरुण यांच्याशी वाद झाला. विकलेल्या संपत्तीतून आलेल्या पैशांतही आरोपी वाटा मागत होता.

CoronaVirus, LockdownNews : 'रेल्वेने नाही, बसनेच पाठवलेजाणार दुसऱ्या राज्यांत अडकलेले लोक'

भावाच्या कुटुंबाचीही हत्या -
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर सिंह हे उन्नाव बॉर्डरवर असलेल्या आपल्या शेतात काम करत होते. आरोपी अजय आणि त्याचा मुलगा अवनीश उर्फ अंकित शेतात अमरसिंह यांच्याकडे गेले. येथे त्यांचा वाद झाला. यात अमरसिंह यांचा मृत्यू झाला. यानंतर शेतातून काम करून परतत असलेला भाऊ अरुण सिंह, त्याची पत्नी रामसखी आणि त्यांच्या मुला-मुलींचीही अजयने हत्या केली. यानंतर त्याने घरी जाऊन आईलाही ठार मारले.

घटनेनंतर अजय स्वतःच बंथरा पोलीस ठाण्यात पोहचला. पोलिसांनी त्याचा मुलगा अवनीश उर्फ अंकितलाही अटक केली आहे. या दोघांचीही चौकशी सुरू आहे.

CoronaVirus News : अमेरिकेकडून भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात; आता परत लाखो डॉलर्सची करणार मदत

Web Title: mass murder in lucknow accused surrendered in police station sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.