शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

दारुड्या तरुणांनी केला महिलेचा विनयभंग

By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST

नागपूर : दारूच्या नशेत तरर्र असलेल्या दोन तरुणांनी चहाविक्रेत्या महिलेशी असभ्य वर्तन करून तिला अश्लिल शिवीगाळ केली. आज सकाळी १०. ३० च्या सुमारास सक्करदऱ्यात घडलेल्या या घटनेने तणाव निर्माण झाला होता.

नागपूर : दारूच्या नशेत तरर्र असलेल्या दोन तरुणांनी चहाविक्रेत्या महिलेशी असभ्य वर्तन करून तिला अश्लिल शिवीगाळ केली. आज सकाळी १०. ३० च्या सुमारास सक्करदऱ्यात घडलेल्या या घटनेने तणाव निर्माण झाला होता.
पीडित महिला (वय २१) चहाची टपरी चालवते. नेहमीप्रमाणे ती आज सकाळी चहा बनवित असताना अजिंक्य विजयराव भुजाडे (वय २३) आणि विक्रांत कोठीराम अतकरे (वय २५) हे स्वीफ्ट कारने (एमएच ३१/ डीसी १७९९) तेथे आले. ते दारूच्या नशेत होते. त्यांनी पीडित महिलेला अश्लिल हातवारे केले. तिने आक्षेप घेतला असता आरोपींनी तिला अश्लिल शिवीगाळ करून तिचा हात पकडला. चहाची टपरी बंद करण्यास सांगितले. यामुळे महिला संतापली. तिचा आरडाओरडा ऐकून घटनास्थळी आजूबाजूची मंडळी धावून आली. त्यांनी भुजाडे आणि अतकरेला पकडले. नागरिकांनाही हे तरुण दमदाटी करू लागले. त्यामुळे नागरिक संतप्त झाले. त्यांनी या दोघांना सक्करदरा पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी या दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. हे दोघेही गरोबा मैदानाजवळ राहतात.
---
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
नागपूर : शिकवणीला जाणाऱ्या मुलीचा (वय १६) पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या राज फारुकी नामक आरोपीवर जरीपटका पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
----