शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
4
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
5
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
6
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
7
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
8
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
9
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
10
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
11
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
12
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
13
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
14
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
15
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
16
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
17
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
18
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
19
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
20
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी ऑफिसमधल्या सहका-याच्या बाईकवर बसली म्हणून पतीने कोयत्याने वार करुन केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 13:14 IST

पत्नी तिच्या ऑफिसमधल्या सहका-याच्या दुचाकीवर बसली म्हणून  संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या केली. मंगळवारी रात्री ही घटना घडली.

ठळक मुद्देआरोपी नागराज रात्री साडेनऊच्या सुमारास पुन्नामबाक्कम येथे दोघांची वाट पाहत थांबला होता. बालाजी तिथून गेल्यानंतर नागराजने त्याच्याजवळच्या कोयत्याने नंदिनीवर वार केले.

चेन्नई - पत्नी तिच्या ऑफिसमधल्या सहका-याच्या दुचाकीवर बसली म्हणून  संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या केली. मंगळवारी रात्री चेन्नईत तिरुवल्लूर येथे ही घटना घडली. एन. नंदिनी (27) असे मृत महिलेचे नाव आहे. पतीसोबत भांडण झाल्यामुळे मागच्या महिन्याभरापासून नंदिनी तीन मुलींसह बीमानथोप्पू गावात आपल्या आई-वडिलांच्या घरी रहात होती. पतीच्या सततच्या संशयी स्वभावामुळे दोघांचे भांडण झाले होते. 

आरोपी नागराज रात्री साडेनऊच्या सुमारास पुन्नामबाक्कम येथे दोघांची वाट पाहत थांबला होता. पत्नी तिथे पोहोचल्यानंतर नागराजने त्याच्या हातातील कोयत्याने बालाजीला धमकावले व तिथून निघून जाण्यास सांगितले. बालाजी तिथून गेल्यानंतर नागराजने त्याच्याजवळच्या कोयत्याने नंदिनीवर वार केले. बालाजी लगेच नंदिनीच्या घरी गेला व तिच्या कुटुंबियांना माहिती दिली. 

आई-वडिल  धावतपळत घटनास्थळी पोहोचले त्यावेळी त्यांना  नंदिनी बेशुद्धावस्थेत सापडली. त्यांनी लगेच 108 क्रमांकावर फोन करुन रुग्णवाहिका बोलावली व तिला तिरुवल्लूर येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला चेन्नईच्या सरकारी रुग्णालयात हलवले. तिथे नंदिनीला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. ती एका ज्वेलरीच्या दुकानात सेल्समनचे काम करायची. 

पोलिसांनी पथके स्थापन करुन नागराजचा शोध सुरु केला आहे. नंदिनी तिच्या ऑफिसमधल्या सहका-यासह बाईकवरुन फिरते हे समजल्यानंतर नागराज अस्वस्थ झाला होता.  त्याला नंदिनीचे दुस-याच्या बाईकवर बसणे मान्य नव्हते. त्यांच्यामध्ये अनेकदा यावरुन खटकेही उडायचे. अशाच एका भांडणातून नंदिनी घर सोडून आई-वडिलांकडे निघून गेली होती. 

टॅग्स :Crimeगुन्हा