6 महिन्यांच्या लेकीला सोडून सून सासऱ्यासह फरार; 1 महिन्यानंतरही पत्ताच नाही, नवरा म्हणतो....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 12:29 IST2023-03-13T12:29:03+5:302023-03-13T12:29:31+5:30

वडिलांच्या कारनाम्यामुळे त्रस्त झालेल्या मुलाने पोलिसांकडे पत्नीचा शोध घेण्याची विनंती केली आहे.

man flees with daughter in law on bike husband pleads police as he did not return even after 1 month | 6 महिन्यांच्या लेकीला सोडून सून सासऱ्यासह फरार; 1 महिन्यानंतरही पत्ताच नाही, नवरा म्हणतो....

6 महिन्यांच्या लेकीला सोडून सून सासऱ्यासह फरार; 1 महिन्यानंतरही पत्ताच नाही, नवरा म्हणतो....

राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक सासरा आपल्याच सुनेच्या प्रेमात पडला आणि जवळपास महिनाभरापासून तो तिच्यासोबत फरार आहे. वडिलांच्या कारनाम्यामुळे त्रस्त झालेल्या मुलाने पोलिसांकडे पत्नीचा शोध घेण्याची विनंती केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीच्या आधारे सासरे आणि सून या दोघांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

पवन वैरागी असे पीडित तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पवन हा बुंदी जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशन हद्दीतील सिलोर गावचा रहिवासी आहे. पवन वैरागी यांनी सांगितले की, तो मजूर म्हणून काम करतो आणि कामानिमित्त अनेकदा बाहेर राहतो. आपल्या अनुपस्थितीत वडिलांनी पत्नीला फसवल्याचा आरोप त्याने केला आहे.

पीडितेने सांगितले की, त्याची पत्नी अतिशय सरळ आहे. त्याला सहा महिन्यांची मुलगीही आहे. पत्नीच्या सरळ स्वभावाचा फायदा वडील रमेश वैरागी यांनी घेतल्याचा आरोप मुलाने केला आहे. यामुळे त्यांनी हे कृत्य केलं आहे. यासोबतच वडील पत्नीसोबत अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दोघेही व्हॅलेंटाइन डेपासून फरार 

पोलिसांनी सांगितले की, ही घटना 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाइन डे रोजी घडली. आपल्या मुलीच्या वयाच्या सुनेवर प्रेम करणाऱ्या सासऱ्याचा अद्यापही शोध लागलेला नाही. ही महिला तिच्या संमतीने सासऱ्यासोबत असल्याचा संशय पोलिसांना आहे. महिनाभरापासून बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध अद्याप लागलेला नाही. त्याच्या शोधात पोलीस विविध ठिकाणी छापे टाकत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: man flees with daughter in law on bike husband pleads police as he did not return even after 1 month