शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

"बायकोपासून वाचवा...!" आई आणि भावासमोर छातीवर बसून महिलेची पतीला बेदम मारहाण; Video Viral 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:37 IST

समोर आलेल्या या नव्या व्हिडिओमध्ये संबंधित महिला तिचा पती लोकेश याला त्याच्या छातीवर बसून बेदम मारहणार करताना दिसत आहे...

गेल्या काही दिवसांपासून महिलांचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यांत त्या त्यांच्या पतीला बेदम मारहाण अथवा त्यांचा छळ करताना दिसत आहेत. नुकताच, मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातून असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे एका लोको पायलटची पत्नी त्याला रोज मारहाण करत होती. जेव्हा त्यांच्या घरात कॅमेरा बसवला तेव्हा हा संपूर्ण प्रकार समोर आला. आता या प्रकरणाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

छातीवर बसून मारहाण - मध्य प्रदेशातून समोर आलेल्या या नव्या व्हिडिओमध्ये संबंधित महिला तिचा पती लोकेश याला त्याच्या छातीवर बसून बेदम मारहणार करताना दिसत आहे. हा संपूर्ण व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून आता पुरावा म्हणून वापरला जात आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लोको पायलटची पत्नी हर्षिता रैकवार त्याला मारहाण करत आहे, तर तिची आई तिच्या शेजारी उभी आहे. महत्वाचे म्हणजे, हर्षिता तिच्या आईच्या सांगण्यावरून तिच्या पतीला बेदम मारहाण करत असल्याचे बोलले जात आहे. हर्षिताचा भाऊही तेथेच उभा असलेला  दिसत आहे. त्याच्या जवळ एक बाळही दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, हा व्हिडिओ २० मार्चचा असल्याचे बोलले जात आहे. तो आता सोशल मीडियावर तुफान शेअर होत आहे.

'मला माझ्या पत्नीपासून वाचवा...' -यापूर्वी लोकेशने एक व्हिडिओही जारी केला होता, त्या व्हिडिओमध्ये तो, माझी पत्नी मला मारहाण करते, मला माझ्या पत्नीपासून वाचवा, असे म्हणताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर इतरही व्हिडिओ शेअर करण्यात आले. याशिवाय, माझी पत्नी मला खोट्या केसमध्ये आणि हुंड्याच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देते. तसेच तिचे संपूर्ण कुटुंब आपल्याला त्रास देते, असेही लोकेशने म्हटले आहे. या संदर्भात सोशल मीडियावरही अनेक युजर्  संताप व्यक्त करत आहेत.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारMolestationविनयभंगSocial Mediaसोशल मीडियाMadhya Pradeshमध्य प्रदेश