शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
4
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
5
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
6
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
7
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
8
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
9
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
10
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
12
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
13
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
14
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
15
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
16
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
17
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
18
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
19
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
20
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
Daily Top 2Weekly Top 5

"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 23:07 IST

जवानाचा आरोप आहे की, त्याच्या पत्नीचे तिच्या भाऊजीसोबतच (बहिणीचा पती) अनैतिक संबंध आहेत. तसेच, आपली अवस्थाही इंदूरच्या 'राजा रघुवंशी' सारखी होऊ नये, अशी भीतीही त्याला सतावू लागली आहे. देवेंद्र सिंह राजावत असे या जवानाचे नाव आहे. त्याने पत्नीपासून संरक्षण मिळावे यासाठी, ग्वाल्हेर पोलिसांत धाव घेतली आहे...

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कायादक प्रकार समोर आला आहे. देशाच्या सीमेवर 'ऑपरेशन सिंदूर'सारख्या मोहिमेत पाकिस्तानला धडा शिकवणारा भारतीय लष्कराचा जवान आता आपल्याच पत्नीच्या जाचामुळे त्रस्त झाला आहे. जवानाचा आरोप आहे की, त्याच्या पत्नीचे तिच्या भाऊजीसोबतच (बहिणीचा पती) अनैतिक संबंध आहेत. तसेच, आपली अवस्थाही इंदूरच्या 'राजा रघुवंशी' सारखी होऊ नये, अशी भीतीही त्याला सतावू लागली आहे. देवेंद्र सिंह राजावत असे या जवानाचे नाव आहे. त्याने पत्नीपासून संरक्षण मिळावे यासाठी, ग्वाल्हेर पोलिसांत धाव घेतली आहे. पोलिसांनीही देवेंद्र यांच्या तक्रारीवर प्रकरणाची चौकशी करण्याचा विश्वास दिला आहे.गोला का मंदिर परिसरात राहणाऱ्या देवेंद्र सिंह राजावत यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, २५ एप्रिल २०२५ रोजी त्यांचे औरैया येथील वंदना चौहान हिच्याशी लग्न झाले. वंदना मुरैना येथील सरकारी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहे.  वंदनाने आपली प्रॉपर्टी हडपण्याच्या उद्देशाने आपल्याशी लग्न केले, असा आरोप जवान देवेंद्र सिंह यांनी केला आहे.

लग्नाच्या पहिल्या रात्री काय घडलं? -देवेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या पहिल्या रात्री वंदनाने त्यांना संपत्तीसंदर्भात विचारणा केली. यावर सर्व काही आईच्या नावावर असल्याचे देवेंद्र यांनी तिला सांगितले. यावर ती रागावली आणि तिने शारीरिक संबंधास नकार दिला. एवढेच नाही तर, लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांतच वंदनाचे तिच्या बहिणीच्या पतीसोबत (भाऊजी) म्हणजेच 'कमल किशो'सोबत अनैतिक संबंध असल्याचे देवेंद्र यांना समजले. यानंतर, २९ एप्रिल रोजी तिच्या बहिणीने (अंजना) विष घेऊन आत्महत्या केली. 

दरम्यान, वंदनाने भाऊजीकडे जाण्याचा आग्रह धरला, तेव्हा देवेंद्र यांनी तिला अडवले. यावर तिने आपल्या माहेरच्यांकडे देवेंद्रने आपल्याला मार-हाण केल्याची तक्रार केली. यानंतर तिच्या माहेरच्यांनी देवेंद्र यांना मारहाण केली. यानंतर पंचायत होऊन सर्व सत्य समोर आल्यानंतर त्यांनी देवेंद्र यांची माफीही मागितली.

देवेंद्र यांना 'ऑपरेशन सिंदूर'च्या ड्यूटीचा इमर्जन्सी कॉल -देवेंद्र यांना ९ मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर'च्या ड्यूटीचा इमर्जन्सी कॉल आल्यामुळे कर्तव्यावर जावे लागले. १७ मे रोजी परत आल्यावर वंदना दागिने घेऊन मुरैना येथे गेल्याचे समजले. मुरैना येथील रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता ती १५ दिवसांची सुट्टी घेऊन आग्र्याला गेल्याचे समजले. यानंतर त्यांनी वंदनाला फोन लावला असता, तिने त्यांनाच धमकावले. यानंतर वंदनाच्या भाऊजीचा कमल किशोरचा देवेंद्र यांना अनेकवेळा फोन आला आणि तो धमक्या देत होता. याशिवाय, वंदनानेही त्यांना फोन करून खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत पन्नास लाख रुपयांची मागणी केली.

जवान देवेंद्र यांच्या तक्रीरीवरून, पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Soldier fears wife's threats after serving in 'Operation Sindoor'.

Web Summary : Indian soldier, part of 'Operation Sindoor', alleges his wife's infidelity and threats. She demands money, threatening false charges and violence, causing him to seek police protection in Gwalior.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस