शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 11:23 IST

लखनौमध्ये एका १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या मृत्यूने त्याच्या कुटुंबाला आणि शेजाऱ्यांना मोठा धक्का बसला.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या मृत्यूने त्याच्या कुटुंबाला आणि शेजाऱ्यांना मोठा धक्का बसला. मुलगा घरी मोबाईलवर फ्री फायर गेम खेळत होता आणि अचानक बेडवर झोपला. बहिणीला वाटलं की, तिचा भाऊ झोपला आहे, पण तो बराच वेळ उठला नाही. हालचालही केली नाही, त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. सडन गेमर डेथची ही घटना आहे. ज्यामध्ये मोबाईल किंवा संगणकावर गेम खेळताना गेमरचा मृत्यू होतो.

मिळालेल्या माहितीनुसार, विवेक मोबाईलवर गेम खेळत होता. त्याची बहीण बाहेरून घरी परतली तेव्हा तिला विवेक बेडवर झोपलेला दिसला, त्याच्या मोबाईलवर गेम सुरू होता. तिला वाटलं की तो खेळताना झोपला असावा. पण त्याने अजिबात काही हालचाल केली नाही तेव्हा मात्र बहिणीला संशय आला आणि तिने मदतीसाठी हाक मारली. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे मुलाला मृत घोषित करण्यात आलं.

'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?

जगभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत जिथे मोबाईल गेमर्सचा अचानक मृत्यू झाला. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अमेरिकन लायब्ररी जर्नलमधून याबाबतची मिळाली आहे. सडन गेमर डेथ म्हणजे गेम खेळता खेळता एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणं.

यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) च्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन (NLM) वर एक रिसर्च अपलोड करण्यात आला आहे. पोर्टलमध्ये असं म्हटलं आहे की, जगभरात अनेक लोक मोबाईलवर गेम खेळताना मृत्युमुखी पडले आहेत. या घटनांमध्ये कोणताही हिंसाचार झालेला नाही आणि मृत्यू मोबाईल गेमशी संबंधित आहेत. त्याचा संबंध इंटरनेट गेमिंग डिसऑर्डरशी देखील जोडण्यात आला आहे.

मोबाईलवर गेम खेळताना लोकांचा मृत्यू

रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की, मोबाईलवर गेम खेळताना अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ही संख्या सुमारे २४ आहे. १९८२ मध्ये एकाचा मृत्यू झाला होता, त्यानंतर २००२ ते २०२१ पर्यंत २३ मृत्यू झाले होते, त्यापैकी बहुतेक पुरुष होते. या व्यक्तींचे वय ११ ते ४० वयोगटातील होतं. अर्ध्याहून अधिक रुग्ण आग्नेय आशियातील होते, ज्यामध्ये सिंगापूर, मलेशिया आणि इंडोनेशिया सारख्या देशांचा समावेश होता. ही माहिती वर्तमानपत्रं आणि पोर्टलवरून गोळा करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragic! 13-year-old dies playing game; Understanding Sudden Gamer Death.

Web Summary : A 13-year-old boy in Lucknow died while playing a mobile game, highlighting the phenomenon of 'Sudden Gamer Death'. Research suggests a link between gaming and such incidents, with multiple cases reported globally, mainly affecting young males.
टॅग्स :onlineऑनलाइनGame Addictionव्हिडिओ गेम व्यसनDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेश