एलपीजी सिलेंडर बुकिंग नियम: किती दिवसांत मिळायला हवा सिलेंडर? जाणून घ्या तुमचे अधिकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 11:03 IST2026-03-17T11:03:18+5:302026-03-17T11:03:28+5:30

LPG Cylinder Delivery Rules 2026: बुकिंगनंतर ४८ तासांत सिलेंडर मिळणे आवश्यक आहे. सरकारी नियम आणि तक्रार करण्याची प्रक्रिया वाचा सविस्तर.

LPG Cylinder Booking Rules: How many days should I get the cylinder? Know your rights! | एलपीजी सिलेंडर बुकिंग नियम: किती दिवसांत मिळायला हवा सिलेंडर? जाणून घ्या तुमचे अधिकार!

एलपीजी सिलेंडर बुकिंग नियम: किती दिवसांत मिळायला हवा सिलेंडर? जाणून घ्या तुमचे अधिकार!

सध्या सुरू असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर, ग्राहकांना आपल्या अधिकारांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या आणि तेल कंपन्यांच्या नियमांनुसार, गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठी एक ठराविक कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

डिलिव्हरीसाठी काय आहे नियम?
शहरी भाग: शहरांमध्ये गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर तो ४८ तासांच्या (२ दिवस) आत ग्राहकाच्या घरी पोहोचणे बंधनकारक आहे.

ग्रामीण भाग: दुर्गम किंवा ग्रामीण भागासाठी हा कालावधी भौगोलिक परिस्थितीनुसार ४८ ते ७२ तास (२ ते ३ दिवस) असा निश्चित करण्यात आला आहे.

पॅनिक बुकिंग टाळा: सरकारने स्पष्ट केले आहे की, एका सिलेंडरच्या डिलिव्हरीनंतर पुढच्या बुकिंगसाठी साधारणपणे 25 ते ४५ दिवसांचे अंतर असणे आवश्यक आहे.

विनाविलंब डिलिव्हरी न झाल्यास काय करावे?
जर एजन्सीने ठरलेल्या वेळेत सिलेंडर दिला नाही, तर ग्राहक पुढील पावले उचलू शकतात. संबंधित तेल कंपनीच्या अधिकृत टोल-फ्री क्रमांकावर तक्रार करता येते. जर तुम्ही स्वतः गॅस एजन्सीवर जाऊन सिलेंडर आणला, तर तुम्ही एजन्सीकडून डिलिव्हरी चार्ज परत मागू शकता, कारण हा चार्ज सिलेंडरच्या किमतीत समाविष्ट असतो. 

सध्याची परिस्थिती
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे सध्या पुरवठा साखळीवर काहीसा परिणाम झाला आहे. मात्र, पेट्रोलियम मंत्रालयाने ग्राहकांना आश्वासन दिले आहे की, घरगुती वापरासाठी पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title : एलपीजी सिलेंडर बुकिंग नियम: अपने अधिकार जानें, डिलीवरी का समय तय!

Web Summary : एलपीजी सिलेंडर डिलीवरी के अपने अधिकार जानें! शहरी क्षेत्रों में 48 घंटे के भीतर, ग्रामीण क्षेत्रों में 48-72 घंटे के भीतर सिलेंडर मिलना चाहिए। देरी होने पर तेल कंपनी को शिकायत करें और खुद लाने पर डिलीवरी चार्ज वापस लें।

Web Title : LPG Cylinder Booking Rules: Know Your Rights, Delivery Timeframes Defined!

Web Summary : Know your LPG cylinder delivery rights! Urban areas get cylinders within 48 hours, rural areas within 48-72 hours. Report delays to the oil company and claim back delivery charges if you pick it up yourself.