शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 08:04 IST

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : सात एक्झिट पोलने वर्तविलेल्या अंदाजांची सरासरी काढली तर एनडीएला सरासरी ३६१ जागा मिळतील तर इंडिया आघाडीला १४५ जागांवर समाधान मानावे लागेल असा निष्कर्ष निघतो.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचे केंद्रात तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन होणार असल्याचा निष्कर्ष बहुतांश एक्झिट पोलमधून काढण्यात आला आहे. मात्र भाजपप्रणीत एनडीए आघाडीला ४०० हून अधिक जागा मिळण्याबाबत एक्झिट पोलमध्ये शंका व्यक्त करण्यात आली आहे.

इंडियाला २९५ पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी संध्याकाळी वर्तविला होता. पण त्यापेक्षाही कमी जागा इंडिया आघाडीला मिळतील असा अंदाज पाच एक्झिट पोलनी वर्तविला आहे. सात एक्झिट पोलने वर्तविलेल्या अंदाजांची सरासरी काढली तर एनडीएला सरासरी ३६१ जागा मिळतील तर इंडिया आघाडीला १४५ जागांवर समाधान मानावे लागेल असा निष्कर्ष निघतो.

भाजपला ३११ जागा तर काँग्रेसला ६३ जागा मिळतील. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला ५२ जागांवर विजय मिळाला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकांत एनडीएला ३७१ ते ४०१ जागा मिळण्याची शक्यता इंडिया टीव्ही-सीएनएक्स एक्झिट पोलने व्यक्त केली आहे. इंडिया आघाडीला १०९ ते १३९ जागा जिंकता येतील. तर जन की बात या एक्झिट पोलने एनडीला ३६२ ते ३९२ व इंडिया आघाडीला १४१ ते १६१ जागा मिळतील असे म्हटले आहे. दैनिक भास्करने केलेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला २८१ ते ३५० व इंडिया आघाडीला १४५ ते २०१ जागा मिळतील असे म्हटले आहे.

केंद्रात ‘एनडीए’ला पुन्हा निवडून देण्यासाठी मतदारांनी केले विक्रमी मतदान : पंतप्रधानकेंद्रात एनडीए सरकारला पुन्हा निवडून देण्यासाठी मतदारांनी विक्रमी संख्येने मतदान केले आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. इंडिया आघाडीचे प्रतिगामी राजकारण मतदारांनी नाकारले आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील मतदारांनी माझ्या सरकारच्या कामगिरीचे बारकाईने निरीक्षण केले आहे. या सरकारच्या कामामुळे देशातील गरीब, तळागाळातील तसेच वंचित लोकांच्या जीवनमानात झालेला चांगला बदल लोकांनी पाहिला आहे. लोकसभा निवडणुकांत मतदान केलेल्या सर्वांचा मी आभारी आहे. त्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग आपल्या लोकशाहीचा पाया आहे. मतदानामध्ये नारीशक्ती व युवा शक्तीने मोठ्या संख्येने सहभाग घेतला, ही उत्साह वाढविणारी घटना आहे, असेही ते म्हणाले.पंतप्रधान पुढे म्हणाले की, आज आपला देश जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आमच्या सरकारच्या प्रत्येक योजनांचे लाभ पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यात आले. त्यात भेदभाव झाला नाही. इंडिया आघाडी संधिसाधू, जातीयवादी व भ्रष्टाचारी आहे. घराणेशाहीच्या राजकारणाचे समर्थन व रक्षण करणे, हेच त्यांचे उद्दिष्ट आहे.

दक्षिण भारत, प. बंगालमध्ये एनडीएची कामगिरी सुधारणार यावर सर्वच एक्झिट पोलचे एकमतयंदा दक्षिण भारत व पश्चिम बंगालमध्ये एनडीएची कामगिरी सुधारणार याबाबत सर्वच एक्झिट पोलचे एकमत आहे. आंध्र प्रदेशात एनडीएला २५ पैकी १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तेलंगणातील १७ जागांपैकी निम्म्याहून अधिक जागांवर भाजपला विजय मिळेल, असा अंदाज आहे. तामिळनाडूमध्ये किमान दोन जागा तर केरळमध्ये एक जागा जिंकून भाजप त्या राज्यांत खाते उघडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये २०१९मध्ये भाजपने २२ पैकी १८ जागा जिंकल्या होत्या. त्यापेक्षा अधिक यश बंगालमध्ये यंदाच्या निवडणुकांत मिळेल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा