शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2024 Amit Shah : स्वत:ची कार नाही, २४ हजार कॅश... पाहा किती आहे गृहमंत्री अमित शाह यांची संपत्ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 08:46 IST

Lok Sabha Election 2024 Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी लोकसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारी अर्ज दाखल केला. गुजरातमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Lok Sabha Election 2024 Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) साठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी भाजपच्या पारंपारिक मतदारसंघ असलेल्या गांधीनगरमधून उमेदवारी दाखल केली आहे. गांधीनगर मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. लालकृष्ण अडवाणी आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रतिनिधित्व केलेल्या जागेचं प्रतिनिधित्व करणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं जनतेसाठी खूप काम केलंय, अशी प्रतिक्रिया त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर दिली. 

अमित शाह यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हापासूनच त्यांचं प्रतिज्ञापत्र चर्चेत आहे. आपल्याकडे स्वतःची गाडी नाही आणि व्यवसाय म्हणून ते शेती करतात आणि सामाजिक कार्यकर्तेही असल्याचं त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय. त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये खासदाराचा पगार, घर-जमीन भाड्याचं उत्पन्न, शेतीचं उत्पन्न आणि डिविडंड मिळकत यांचा समावेश होतो. यासोबतच त्याच्यावर ३ गुन्हे दाखल असल्याचीही नोंद असल्याचं त्यात नमूद करण्यात आलंय. 

 

काय काय सांगितलंय प्रतिज्ञापत्रात? 

१. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे अजूनही स्वतःची कार नाही २. त्यांच्याकडे ₹ २० कोटींची जंगम मालमत्ता तर ₹ १६ कोटींची स्थावर मालमत्ता आहे.२. अमित शाह यांच्यावर अजूनही ₹ १५.७७ लाखांचं कर्ज आहे. 4. त्यांच्याकडे फक्त २४,१६४ रुपये रोख आहेत. 5. अमित शाह यांच्याकडे ₹७२ लाख किमतीचे दागिने आहेत, त्यापैकी केवळ ₹ ८.७६ लाख त्यांनी खरेदी केले आहेत. ६. त्यांच्या पत्नीकडे १.१० कोटी रुपयांचे दागिने आहेत, ज्यात १६२० ग्रॅम सोनं आणि ६३ कॅरेट हिरे आहेत. ७. २०२२-२३ मध्ये अमित शाह यांचं वार्षिक उत्पन्न ₹७५.०९ लाख होतं.८. त्यांच्या पत्नीचं वार्षिक उत्पन्न ₹३९.५४ लाख आहे. ९. अमित शाह यांनी त्यांचा व्यवसाय शेती आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून घोषित केला आहे. त्यांच्या विरोधात ३ गुन्हे दाखल आहेत. १०. त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये खासदाराचा पगार, घर-जमीन भाड्यानं मिळणारं उत्पन्न, शेतीचं उत्पन्न आणि शेअर डिविडंडचं उत्पन्न यांचा समावेश होतो. ११. त्यांच्या पत्नीकडे ₹२२.४६ कोटींची जंगम मालमत्ता, ₹९ कोटींची स्थावर मालमत्ता असून त्यांच्यावरही २६.३२ लाख रुपयांचं कर्ज देखील आहे. 

गुजरातमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान 

गुजरातमधील लोकसभेच्या २६ जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. गुजरातच्या सर्व जागांवर तिसऱ्या टप्प्यात म्हणजे ७ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. देशातील ५४३ लोकसभा जागांसाठी मतमोजणी ४ जून रोजी पार पडेल.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहgandhinagar-pcगांधीनगरGujaratगुजरात