शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा 2024; जगातील सर्वात महागडी निवडणूक, 2019 च्या तुलनेत दुप्पट खर्च...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 19:33 IST

Lok Sabha Election 2024 :निवडणुकीवर होणाऱ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष खर्चाचे आकडे पाहून चक्रावून जाल...

Lok Sabha Election 2024 : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धूम सुरू आहे. एकूण सात टप्प्यात विविध ठिकाणी मतदान होणार असून, 4 जून रोजी निकाल लागेल. सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताची निवडणूकदेखील तितकीच मोठी आहे. या निवडणुकीवर हजारो-लाखो रुपयांचा खर्च केला जातोय. NGO सेंटर फॉर मीडिया स्टडीज (CMS) ने दावा केला आहे की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अंदाजे 1.35 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही रक्कम 2019 च्या निवडणुकीत झालेल्या खर्चाच्या दुप्पट आहे. 

एनजीओने सांगितल्यानुसार, मागील लोकसभा निवडणुकीत, 2019 साली सुमारे 60,000 कोटी रुपये खर्च झाले होते.संस्थेचे अध्यक्ष एन भास्कर राव यांनी सांगितले की, या सर्वसमावेशक खर्चामध्ये राजकीय पक्ष, उमेदवार, सरकार आणि निवडणूक आयोगासह निवडणुकीशी संबंधित सर्व प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष खर्चाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ही संस्था गेल्या 35 वर्षांपासून निवडणूक खर्चाचा मागोवा घेत आहे. 

राव पुढे म्हणाले की, आम्ही सुरुवातीला 1.2 लाख कोटी रुपये खर्चाचा अंदाज लावला होता. पण, इलेक्टोरल बाँड्सची माहिती उघड झाल्यानंतर आम्ही हा आकडा 1.35 लाख कोटी रुपये केला आहे.

अज्ञात स्त्रोतांकडून 60 टक्के निवडणूक निधी...सोसायटी फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अलीकडील निरीक्षणातून भारतातील राजकीय निधीमध्ये पारदर्शकतेचा लक्षणीय अभाव दिसून आला आहे. त्यात दावा करण्यात आला आहे की, 2004-05 ते 2022-23 पर्यंत देशातील सहा प्रमुख राजकीय पक्षांना सुमारे 60 टक्के निधी(एकूण 19,083 कोटी रुपये) अज्ञात स्त्रोतांकडून आले आहेत, ज्यात निवडणूक रोख्यांमधून मिळालेल्या पैशांचा समावेश आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग