शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

सासू आणि नणदेच्या खुनातील महिलेची जन्मठेप हायकोर्टात रद्द सासरच्या चौघांना दिले होते अन्नातून विष : दोघे बचावले होते

By admin | Updated: February 20, 2016 00:07 IST

नागपूर : सासरच्या चौघांना अन्नातून विष देऊन सासू आणि नणंद यांचा खून करणाऱ्या आणि अन्य दोघांच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एका महिला आरोपीस चंद्रपूर सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेप व अन्य सर्व शिक्षा उच्च न्यायालयाचे न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. विनय देशपांडे यांच्या खंडपीठाने रद्द करून तिला दोषमुक्त केले.

नागपूर : सासरच्या चौघांना अन्नातून विष देऊन सासू आणि नणंद यांचा खून करणाऱ्या आणि अन्य दोघांच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एका महिला आरोपीस चंद्रपूर सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेप व अन्य सर्व शिक्षा उच्च न्यायालयाचे न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. विनय देशपांडे यांच्या खंडपीठाने रद्द करून तिला दोषमुक्त केले.
सुनिता किशोर सोयाम (२०), असे आरोपी महिलेचे नाव असून ती चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल येथील रहिवासी आहे.
प्रकरण असे की, सुनिताचा विवाह मे २०१० मध्ये किशोर सोयामसोबत झाला होता. खुद्द किशोर, त्याचे वडील मंगरू (६०), आई कमलाबाई (५०), भाऊ सचिन (२१) आणि नणंद सोनी (१८) आणि खुद्द सुनिता एकत्र राहत होते. सुनिता ही किशोरला सतत मला तू पसंत नाहीस, माझ्या वडिलाने माझ्या इच्छेविरुद्ध लग्न करून दिले आहे. ती भांडण करून किशोरला टोचून बोलायची, सोडचिठ्ठी मागत होती, सोडचिठ्ठी दिली नाही तर सर्वांना पाहून घेण्याची धमकी देत होती. तिने मंगळसूत्रही तोडून फेकले होते. ४ जानेवारी २०१२ रोजी किशोर हा कामानिमित्त बाहेर गेला होता. तो रात्री ९ वाजताच्या सुमारास घरी परतला असता त्याला त्याचे आई, वडील, भाऊ आणि बहीण उलट्या करताना दिसले होते. त्यांनी सुनिताने जेवणातून विष दिल्याचे त्याला सांगितले होते. या सर्वाना शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आले असता कमलाबाई आणि सोनीचा मृत्यू झाला होता. उपचारानंतर मंगरू आणि सचिन हे दोघे बचावले होते. किशोरच्या तक्रारीवरून मूल पोलिसांनी ७ जानेवारी २०१२ रोजी भादंविच्या ३०२, ३०७, ३२८ कलमान्वये गुन्हा दाखल करून सुनिताला अटक केली होती. १२ मार्च २०१३ रोजी चंद्रपूर सत्र न्यायालयाने सुनिताला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप, १ हजार रुपये दंड, ३०७ अंतर्गत ५ वर्षे सश्रम कारावास, ५०० रुपये दंड आणि ३२८ कलमांतर्गत ५ वर्षे सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली होती. या सर्व शिक्षांना आव्हान देणारे अपील सुनिताने उच्च न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयात आरोपी महिलेच्यावतीने ॲड. राजेंद्र डागा यांनी काम पाहिले.