शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शिवतीर्थ रिकामे करून द्या पत्रयुद्ध : पोलीस दलाचे जि.प.ला पत्र

By admin | Updated: September 7, 2016 21:28 IST

जळगाव : गणेश विसर्जन मिरवणुकीसंबंधी जिल्हा परिषदेने आपल्या अखत्यारिमधील शिवतीर्थ मैदान रिकामे करून द्यावे व सहकार्य करावे, अशा आशयाचे पत्र जिल्हा पोलीस दलाने जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना दिले आहे. परंतु या मैदानावर सध्या आनंद मेळा सुरू आहे. त्यांच्याकडून भाडे आगाऊ स्वरुपात घेतले आहे. त्यांना लागलीच मैदान रिकामे करण्याचे आदेश देणे कसे शक्य आहे, असे उत्तर देण्याची तयारी जि.प.प्रशासनाने सुरू केली आहे.

जळगाव : गणेश विसर्जन मिरवणुकीसंबंधी जिल्हा परिषदेने आपल्या अखत्यारिमधील शिवतीर्थ मैदान रिकामे करून द्यावे व सहकार्य करावे, अशा आशयाचे पत्र जिल्हा पोलीस दलाने जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना दिले आहे. परंतु या मैदानावर सध्या आनंद मेळा सुरू आहे. त्यांच्याकडून भाडे आगाऊ स्वरुपात घेतले आहे. त्यांना लागलीच मैदान रिकामे करण्याचे आदेश देणे कसे शक्य आहे, असे उत्तर देण्याची तयारी जि.प.प्रशासनाने सुरू केली आहे.
शिवतीर्थ मैदानावर ८ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीसाठी आनंद मेळा भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. व्यावसायिक दरात जि.प.ने हे मैदान आनंद मेळा आयोजकांना भाडे तत्त्वावर दिले आहे. प्रतिदिन २५ हजार रुपये अशा दरात भाडे आकारले असून, त्याची रक्कम जि.प.ने घेतली आहे.

पोलिसांचे मिरवणुकांचे कारण
पोलीस दलाने गणेश विसर्जन मिरवणुकीसंबंधी वाहनांची व्यवस्था, इतर मुद्दे लक्षात घेता हे मैदान रिकामे करून द्यावे, असे पत्र जि.प.प्रशासनाला दिले आहे. मंगळवारी हे पत्र जि.प.सीईओ यांच्या कार्यालयात प्राप्त झाले.

या पत्रासंबंधी काय उत्तर द्यावे, याबाबत मंगळवारी सायंकाळी सीईओ व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात चर्चा झाली.

मैदानावर सध्या आनंद मेळा सुरू आहे. त्याच्याकडून भाडे आकारले आहे, असे उत्तर जि.प.प्रशासन पोलीस दलास देणार आहे. मैदान देण्याबाबत स्पष्ट नकार दिला जाणार नाही, असे यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी म्हणाले.