शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

टोलविरोधी आंदोलनाला भाजप नेत्याची पाठ (भाग - १)

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

टोलविरोधी आंदोलनाला भाजप नेत्याची पाठ

टोलविरोधी आंदोलनाला भाजप नेत्याची पाठ
शोभाताई फडणवीस यांचा मनसर, बोरखेडीत रास्ता रोको : वाहतूक खोळंबली
रामटेक/बोरखेडी: भाजपच्या ज्येष्ठ नेत्या विधान परिषद सदस्य शोभाताई फडणवीस टोल वसुलीविरोधात बुधवारी रस्त्यावर उतरल्या. नागपूर जिल्ह्यातील मनसर आणि बोरखेडी येथील टोलनाके बंद करण्यात यावे, यासाठी त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनामुळे नागपूर-हैदराबाद आणि नागपूर-जबलपूर महामार्गावरील वाहतूक काही तासांसाठी विस्कळीत झाली.
राज्यात सत्ता आल्यानंतर टोलनाके बंद करण्याची घोषणा भाजपने केली होती. मात्र राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. बुधवारी झालेल्या या आंदोलनाला जिल्ह्यातील भाजप नेते आणि आमदारांनी पाठ फिरविली, त्यामुळे टोल नाके बंद करण्यात भाजपात असलेले मतभेद पुन्हा दिसून आले.
मनसर आणि बोरखेडी टोल नाके बंद करण्याची मागणी यापूर्वी आ. शोभाताई फडणवीस यांनी केली होती. बोरखेडी आणि मनसर टोलनाके असलेल्या मार्गाच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
रामटेक तालुक्यातील मनसर आणि बुटीबोरी नजीकच्या बोरखेडी येथील टोल नाके बंद करण्यासाठी बुधवारी सकाळी ७ वाजतापासून शोभाताई फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात झाली. त्यामुळे या नाक्यांवर दिवसभर टोल वसुली बंद होती. मनसर येथील नाक्यावर दुपारी २ वाजेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी मध्यस्थी करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या या प्रयत्नाला आंदोलनकर्त्यांनी विरोध केला. दुपारी १ वाजताच्या सुमारास शोभाताई फडणवीस आंदोलस्थळी पोहोचल्या. त्यावेळी त्यांनी टोलविरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले. या आंदोलनात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिक संघर्ष समिती, ट्रक वाहतूकदार असोसिएशन, ब्रिक्स असोसिएशन तसेच इतर सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या आंदोलनात रामटेकचे आमदार. डी. मल्लिकार्जुन रेड्डी सहभागी झाले नव्हते. बोरखेडी नाक्याजवळ शोभाताईंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. येथे सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास आंदोलकांनी वाहने अडवायला सुरुवात केली. तासभरात नाक्याच्या दोन्ही बाजूूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. काही वाहनचालकांनी आडमार्गाने वाहने वळवून मार्ग काढला. मात्र, अनेकांना दोन ते अडीच तास ताटकळत रहावे लागले. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)