शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे कराडपर्यंत जोडली

By admin | Updated: February 27, 2015 02:40 IST

कुछ नया जोडना होगा, कुछ पुराना तोडगा होगा..’ असे सांगत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वे उर्वरित महाराष्ट्राला जोडली. कराड ते चिपळूण हा ११२ किलोमीटरचा मार्ग

रघुनाथ पांडे, नवी दिल्ली‘कुछ नया जोडना होगा, कुछ पुराना तोडगा होगा..’ असे सांगत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वे उर्वरित महाराष्ट्राला जोडली. कराड ते चिपळूण हा ११२ किलोमीटरचा मार्ग जोडण्यासाठी १२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यामुळे कोलकाता ते चिपळूण व्हाया पुणे हा नवा रेल्वेमार्ग तयार होणार आहे. एवढेच नव्हेतर, पुणे - लोणावळा या मार्गावर तिसरा ट्रॅक, पुणे - नाशिक मार्गासह पाच मार्गांचे सर्वेक्षण तर इगतपुरी - भुसावळ या मार्गाच्या तिसऱ्या मार्गासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी महाराष्ट्रासाठी १२ हजार २३९ कोटींचे प्रकल्प मंजूर केले. त्यापैकी या वर्षी ४ हजार ३७४ कोटीं रुपयांची तरतूद केली आहे. रेल्वे प्रकल्पात राज्य सरकारचा बरोबरीचा वाटा राहणार असल्याने या प्रकल्पांना गती येण्यासाठी राज्यासोबत रेल्वेला जोडणारी कंपनी असेल, त्यामुळे प्रकल्पातील अडचणी दूर करून कार्यपद्धती व कालबद्धता निश्चित होणार आहे, असे रेल्वमंत्री प्रभू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. चिपळूण - कराड हा नवा मार्ग करून पुढे कोकण रेल्वे पुण्याशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ११२ किलोमीटरच्या या मार्गासाठी यंदाच्या वर्षी १२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मागच्या रेल्वे अर्थसंकल्पात राज्यासाठी १४७४ कोटींची तरतूद होती, ती यंदा १२९ टक्क्यांनी वाढवून ३३७६ कोटी करण्यात आली. प्रवासी सुविधांसाठी ४४६ कोटी एवढ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईसाठी ११ हजार कोटी : उपनगरीय रेल्वेचे जाळे बळकट करण्यासाठी मुंबई शहर विकास प्रकल्पाचा (एमयूटीपी )तिसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी या अर्थसंकल्पात ११ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी यंदा १ हजार कोटी रुपयांचा निधी, १ हजार कोटी राज्य सरकार व उरलेली रक्कम बाजारातून उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून मुंबईत मेट्रोचे जाळे बळकट करण्यात येणार आहे.> रस्ते संरक्षण कार्यनागपूर विभागातील केबल, रिले, बूम, सहायक उपकरणांमध्ये बदल- ९० लाख, शेगाव रेल्वे उड्डाण पूल- २ कोटी, काटोल रेल्वे उड्डाण पूल- ६० लाख, नरखेड रेल्वे उड्डाण पूल- १ कोटी ५० लाख, बाबूपेठ रेल्वे उड्डाण पूल- ५ लाख, वर्धा- नागपूर- सिंधीनजीक रेल्वे उड्डाण पूल- ५ लाख, वर्धा - नागपूर- बुटीबोरीनजीक रेल्वे उड्डाण पूल- ५ लाख, बडनेरा- वर्धा फाटक क्र. ७८ आणि ८८ ऐवजी, पर्यायी रस्ता तयार करणे- ५ लाख, वर्धा - नागपूर लूप/ यार्ड- १० लाख, आमला- नागपूर रेल्वे मार्ग नुतनीकरण ७० किमी.- ३ कोटी २५ लाख, नागपूर- वर्धा रेल्वे मार्ग नुतनीकरण ५४ किमी- ६१ लाख, वर्धा- बल्लारशाह रेल्वे मार्ग नुतनीकरण ९.९ किमी- ६३ लाख, भुसावळ- बडनेरा रेल्वे मार्ग नुतनीकरण २४ किमी- ७ कोटी