शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

चेंगराचेंगरीनंतर काशीबुग्गा मंदिर भाविकांसाठी बंद; ८ महिलांसह ९ जणांचा गेलेला बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 14:02 IST

कार्यक्रमासाठी आयोजकांनी परवानगी घेतली नव्हती

काशीबुग्गा: आंध्र प्रदेशातील काशीबुग्गा येथील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरातील धार्मिक समारंभादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी हे मंदिर भाविकांसाठी बंद केले आहे. शनिवारी या मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ महिला व एका मुलासह ९ ठार, तर अनेक जण जखमी झाले होते. या दुर्घटनेत अनेक भाविकांची हाडे तुटली असून काही जणांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शनिवारी घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाविकांचा मंदिरातील प्रवेश थांबवण्यात आल्याचे श्रीकाकुलम जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक के. व्ही. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ९ जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर कुटुंबीयांकडे सुपूर्द केले आहेत. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोघांची प्रकृती स्थिर असून इतर जखमींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. मंदिरात कार्यक्रम घेण्यासाठी आयोजकांनी कोणतेही परवानगी घेतली नव्हती व पोलिस सुरक्षेसाठीदेखील अर्ज केला नव्हता. कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी २५ ते ३० हजार लोक एकत्र आले होते.

एवढे लोक एकत्र आले तर मी काय करू शकतो?

एकाच वेळी एवढे लोक एकत्र आले तर मी काय करू शकतो, असा सवाल करत श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिराचे ९४ वर्षीय संस्थापक व पुजारी मुंकद पांडा यांनी या दुर्घटनेला आपण जबाबदार नसल्याचा दावा केला आहे. इतर दिवसांप्रमाणेच कमी लोक येतील, असे वाटल्यामुळे आपण पोलिसांना सूचना दिली नाही. नेमके काय झाले ते कळले नाही, त्यामुळे मी कळवले नसल्याचे पांडा म्हणाले.

नियमांचे पालन केले नाही

कोणताही कार्यक्रम असला तरी मंदिर किंवा धार्मिक संस्थांना त्यासंदर्भात माहिती पोलिसांना देणे अनिवार्य असते. मात्र, या मंदिर व्यवस्थापनाने सुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे ही दुर्घटना उघडली. याप्रकरणी भादंविच्या विविध कमलाअंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे रेड्डी यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kashibugga Temple Closed After Stampede; Nine Pilgrims Dead

Web Summary : Following a deadly stampede at the Sri Venkateswara Swamy Temple in Kashibugga, Andhra Pradesh, the temple is closed. Nine died, including eight women, during a religious event. Organizers lacked permission and police security. The temple founder claimed no responsibility, citing unexpected crowds and unawareness.
टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशStampedeचेंगराचेंगरी