कर्नाटकात EVM नव्हे, तर मतपत्रिकांद्वारे मतदान; बंगळुरू महापालिकेच्या निवडणुकीत करणार वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 06:27 IST2026-01-20T06:26:24+5:302026-01-20T06:27:41+5:30
सर्व संबंधितांशी सल्लामसलत केल्यांनतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

कर्नाटकात EVM नव्हे, तर मतपत्रिकांद्वारे मतदान; बंगळुरू महापालिकेच्या निवडणुकीत करणार वापर
बंगळुरू: ‘ईव्हीएम’च्या विश्वासार्हतेवर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात आगामी बंगळुरू महापालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका मतपत्रिकांद्वारे घेतल्या जातील. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी ही घोषणा केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने गेल्या सप्टेंबरमध्ये स्थानिक निवडणुकांसाठी मतपत्रिका वापरण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाला केली होती. सर्व संबंधितांशी सल्लामसलत केल्यांनतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त जी. एस. संगरेशी यांनी सांगितले.
२५ मेनंतर निवडणुका
बृहत बंगळुरू प्राधिकरणाअंतर्गत येणाऱ्या पाच नगर परिषदांच्या निवडणुका २५ मेनंतर मतपत्रिकांद्वारे घेण्याची घोषणा संगरेशी यांनी केली. जिल्हा व तालुका पंचायतीसाठीच्या निवडणुकांतही मतपत्रिकांचाच वापर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
निर्णय दबावाखातर नाही
आयोगाने हा निर्णय सरकारच्या दबावाखातर घेतला नाही. आयोग एक स्वायत्त संस्था असून आयोगाला निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत, असे आयुक्त म्हणाले.