कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय: 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 13:03 IST2026-03-06T13:02:18+5:302026-03-06T13:03:01+5:30

या निर्णयामुळे सोशल मीडियावर संपूर्ण बंदी लागू करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

Karnataka bans Social Media for children below 16, announces CM Siddaramaiah | कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय: 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय: 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी

Social Media Ban in Karnataka: कर्नाटक सरकारने राज्यात 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी(दि.6) कर्नाटक विधानसभेत राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली. वाढत्या मोबाईल वापरामुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.

मोबाईल वापराच्या दुष्परिणामांवर नियंत्रणासाठी निर्णय

अर्थसंकल्पीय भाषणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, मुलांमध्ये वाढत्या मोबाईल वापरामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर बंद केला जाईल. 

देशातील पहिले राज्य

या निर्णयामुळे सोशल मीडियावर संपूर्ण बंदी लागू करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. यापूर्वी आंध्र प्रदेश आणि गोवा सरकारांनीही मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध घालण्याबाबत विचार सुरू असल्याचे संकेत दिले होते. मात्र, कर्नाटकने या विषयावर सर्वप्रथम स्पष्ट आणि ठोस निर्णय जाहीर केला आहे.

शाळा-कॉलेजमध्ये मोबाईल वापरावरही चर्चा

मागील महिन्यात कर्नाटक सरकारने 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मोबाईल वापरावर मर्यादा आणण्याबाबतही विचार सुरू केला होता. या संदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सरकारी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी बैठक घेऊन त्यांचे मत जाणून घेतले.

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत चिंता

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडियाचे वाढते व्यसन चिंताजनक असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, सोशल मीडियाचा अतिवापर विद्यार्थ्यांच्या वर्तनावर, शिक्षणावर आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करत आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये मुलांचा ड्रग्जकडे झुकाव वाढत असल्याचीही चिंता त्यांनी व्यक्त केली.

केंद्र सरकारची तयारी सुरू

दरम्यान, गेल्या महिन्यात नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या एआय समिट दरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही सांगितले होते की, भारत सोशल मीडियावर वयानुसार निर्बंध लागू करण्याची तयारी करत आहे. 

ऑस्ट्रेलियातही समान निर्बंध

दरम्यान, ऑस्ट्रेलियानेही अलीकडेच 16 वर्षांखालील मुलांना Instagram, TikTok, Snapchat, YouTube आणि X (माजी ट्विटर) सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वापरावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title : कर्नाटक में 16 साल से कम उम्र के बच्चों के लिए सोशल मीडिया पर प्रतिबंध

Web Summary : कर्नाटक सरकार ने 16 साल से कम उम्र के बच्चों के लिए सोशल मीडिया पर प्रतिबंध लगाया। मुख्यमंत्री सिद्धरामय्या ने मोबाइल के दुष्परिणामों को देखते हुए यह घोषणा की। मानसिक स्वास्थ्य और नशे की लत पर चिंता जताई गई।

Web Title : Karnataka bans social media for under-16s: Landmark decision.

Web Summary : Karnataka bans social media for those under 16 to curb adverse effects of mobile use. CM Siddaramaiah announced this during the state budget presentation, citing concerns about mental health and potential drug use.