शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

दरेगाव येथे कानिफनाथ यात्रोत्सव संपन्न

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

दरेगाव : संपूर्ण जिल्‘ात कानिफनाथ महाराजांचे प्रसिद्ध स्थान असणार्‍या श्रीक्षेत्र दरेगाव येथे हजारो भाविकांच्या साक्षीने श्रद्धेच्या रंगात आणि भक्तिच्या जल्लोषात कानिफनाथ महाराज यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला.

दरेगाव : संपूर्ण जिल्‘ात कानिफनाथ महाराजांचे प्रसिद्ध स्थान असणार्‍या श्रीक्षेत्र दरेगाव येथे हजारो भाविकांच्या साक्षीने श्रद्धेच्या रंगात आणि भक्तिच्या जल्लोषात कानिफनाथ महाराज यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला.
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्‍या चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील कानिफनाथ महाराजांच्या यात्रोत्सवास रंगपंचमीला प्रारंभ झाला. या दिवशी सकाळी गावातून रथयात्रेस प्रारंभ झाला. यावेळेस हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. रथापुढे नवस केलेल्या भाविकांनी लोटांगणे घेतली. डीजे, वाजंत्री, भजनांसह सवाद्य मिरवणूक पार पडत असतानाच मोठ्या प्रमाणात जनसमुदाय रंगाचा वर्षाव करीत जोशपूर्ण रंगफेकीतून नाचणारे युवक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. जिल्‘ातून ठिकठिकाणांहून आलेल्या काठ्यांचीही मिरवणूक हनुमान मंदिराजवळ पार पडली. सायंकाळी रामायणावर आधारित आखाडी होणार होती; मात्र अवेळी आलेल्या पावसामुळे आखाडी दुसर्‍या दिवशी घेण्यात आली.
तत्पूर्वी दोन दिवस रात्री लोकनाट्य तमाशा हा मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पडला. पंचमीच्या दुसर्‍या दिवशी षष्ठीला गावाच्या पश्चिम भागात असणार्‍या कानिफनाथ मंदिराजवळ भव्य यात्रा भरली. भाविकांनी दर्शनासाठी तसेच नवसपूर्तीसाठी गर्दी केली होती. येथे यावर्षी नियोजनबद्धरीत्या कुस्त्यांचा फड (आखाडा) रंगला.
जिल्हा व महाराष्ट्रातून विविध ठिकाणांहून पहिलवानांनी सहभाग घेतला. गावकर्‍यांतर्फे विजेत्या पहिलवांना रोख स्वरुपात बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यात्रेत चांदवड पोलीस स्थानकातर्फे चोख बंदोबस्त राखण्यात आला. मंदिर परिसरात षष्ठीला दुपारपासून ते सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांनी आकाश पाळणे, विविध मनोरंजनात्मक खेळ पाहणे आणि खरेदीचा आनंद लुटण्यासाठी गर्दी केली होती. भाविकांनी यात्रेसाठी आलेल्या नागरिकांसाठी महाप्रसाद आयोजनही केले होते. (वार्ताहर)
-----