शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘कणखर’ मोदींची वायकोंमुळे तारांबळ

By admin | Updated: May 24, 2014 03:56 IST

पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महेंद्र राजपक्षे यांना निमंत्रण देण्यावरून भडकलेले ‘एमडीएमके’चे संस्थापक अध्यक्ष वायको यांच्या धमकीमुळे नरेंद्र मोदी यांची तारांबळ उडाली.

गजानन जानभोर, नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महेंद्र राजपक्षे यांना निमंत्रण देण्यावरून भडकलेले ‘एमडीएमके’चे संस्थापक अध्यक्ष वायको यांच्या धमकीमुळे नरेंद्र मोदी यांची तारांबळ उडाली. शेवटी शुक्रवारी दुपारी भाजपाचे अध्यक्ष राजनाथसिंह आणि ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी वायको यांची मनधरणी केली आणि त्यांना खूश करण्यासाठी श्रीलंकेतील तामिळ मुख्यमंत्र्यांना शपथविधीचे निमंत्रण देण्याचा तोडगा काढण्यात आला. मोदी यांच्या शपथविधीला श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांना बोलावण्यास वायको यांनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून भाजपात अस्वस्थता आहे. मोदी यांच्या शपथविधीसाठी ‘सार्क’मधील सर्व देशांचे प्रमुख आणि पंतप्रधानांना निमंत्रण दिले. त्याचाच एक भाग म्हणून श्रीलंकेच्या राष्ट्रप्रमुखांना बोलविणे आवश्यक आहे, अशी आपली बाजू भाजपाने वायको यांच्याकडे मांडली. परंतु वायकोंचा श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांना तीव्र विरोध आहे. राजपक्षे यांच्या कार्यकाळात तामिळ जनतेवर सातत्याने अन्याय होत आहे. शिवाय ते जर आले तर तामिळ जनतेच्या भावना दुखावतील ही वायकोंची भूमिका आहे. हा वाद निर्माण झाल्यानंतर दोन दिवस दिल्ली शांत होती. परंतु गुरुवारी रात्री नरेंद्र मोदी दिल्लीत आल्यानंतर वायकोंची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू झाले. नरेंद्र मोदी यांनी रात्री यासंदर्भात पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह आणि जेष्ठ नेते अरुण जेटली यांच्याशी चर्चा केली. शुक्रवारी सकाळी या दोन्ही नेत्यांनी फोनवर वायको यांच्याशी संपर्क साधून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु वायको आपल्या भूमिकेवर ठाम होते. आज शुक्रवारी दुपारी पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह आणि ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी वायको यांना आपल्या निवासस्थानी चहाचे निमंत्रण दिले. त्यानुसार वायको यांनी राजनाथ आणि जेटली यांची भेट घेतली. या चर्चेतून यशस्वी तोडगा काढण्यात आला. या तोडग्यानुसार वायको यांना खूश करण्यासाठी श्रीलंकेच्या उत्तर प्रांताचे पहिले तामिळ मुख्यमंत्री सी.व्ही. विघ्नेस्वरन यांनादेखील मोदी यांच्या शपथविधीचे निमंत्रण देण्याचे ठरले. शुक्रवारी दुपारी राजनाथ यांनी मुख्यमंत्री विघ्नेस्वरन यांना फोनवरून निमंत्रण दिले. वायको यांची समजूत घालता घालता दोन दिवस भाजपा नेत्यांची बरीच दमछाक झाली. केंद्रात स्पष्ट बहुमत मिळाल्याने आत्मविश्वास उंचावलेल्या भाजपाला भविष्यात मित्रपक्षांच्या भूमिकेचाही तेवढाच सन्मान करावा लागेल हे या प्रकरणातून समोर आले आहे. शपथविधी समारंभापूर्वी कुठलाही वाद निर्माण होऊ नये यासाठी मित्रपक्ष असलेल्या ‘एमडीएमके’च्या वायकोंची मनधरणी करताना ‘कणखर’ नरेंद्र मोदी यांना मात्र दोन पावले माघार घ्यावी लागली.