शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कंगना, कल्याण बॅनर्जी आणि प्रियंका गांधी, संसद भवनाच्या आवारात रंगले हास्यविनोदात, नेमकं काय घडलं?  

By बाळकृष्ण परब | Updated: March 27, 2025 16:15 IST

Parliament Budget Session 2025: संसदेत आणि राज्यांच्या विधानभवनांमध्येही खेळीमेळीचं वातावरण क्वचितच दिसतं. या पार्श्वभूमीवर संसद भवनाच्या मकर द्वारावर बुधवारी असं दृश्य दिसलं ज्याची आता दिल्लीतील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

गेल्या काही काळात टोकाच्या राजकीय विरोधामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील सौहार्द जवळपास संपुष्टात आलेला आहे. राजकारणाबाहेरील मैत्री हा प्रकारही कमी झाला आहे. त्यामुळे संसदेत आणि राज्यांच्या विधानभवनांमध्येही खेळीमेळीचं वातावरण क्वचितच दिसतं.  या पार्श्वभूमीवर संसद भवनाच्या मकर द्वारावर बुधवारी असं दृश्य दिसलं ज्याची आता दिल्लीतील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

त्याचं झालं असं की, बुधवारी संसदेतून घरी जाण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी कारची वाट पाहत होते. त्याचवेळी त्यांचं लक्ष उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीला उभ्या असलेल्या भाजपा खासदार कंगना राणौत यांच्याकडे गेली. कंगना राणौत ह्यासुद्धा आपल्या गाडीची वाट पाहत होत्या. तेव्हा कंगना राणौत यांच्याकडे पाहत कल्याण बॅनर्जी म्हणाले की, आज माझा दिवस खूप चांगला आहे. भारताची ब्युटी क्विन सुद्धा इथेच आहे आहे. तेव्हा कंगना राणौत यांनी अहो दादा असं काही नाही, असं म्हणत कंगना राणौत यांना उत्तर दिलं. 

कंगना राणौत आणि कल्याण बॅनर्जी यांच्यात हास्यविनोद सुरू असतानाच तिथे काँग्रेसच्या सरचिटणीस आणि खासदार प्रियंका गांधी आल्या. त्यावेळी द मोस्ट ग्लॅमरस लेडी असं कल्याण बॅनर्जी प्रियंका गांधी यांना उद्देशून म्हणाले. त्यावर प्रियंका गांधी जोराजोरात हसल्या आणि कल्याण बॅनर्जी आणि कंगनाकडे पाहून म्हणाल्या की,  नाही नाही मी ग्लॅमरस नाही, मात्र कल्याण बॅनर्जी यांनी तुम्ही ग्लॅमरस आहात असं पुन्हा एकदा सांगितलं. त्यावर प्रियंका गांधी मी ग्लॅमरस नाही असं पुन्हा म्हणाल्या आणि हसत हसत कारच्या दिशेने गेल्या.

त्यानंतर कल्याण बॅनर्जी आणि कंगना राणौत यांच्यामध्ये पुन्हा एकदा हास्यविनोद सुरू झाला. कंगना अजूनही त्यांच्या कारची वाट पाहत होत्या. संधी पाहून कल्याण बॅनर्जी म्हणाले की, तुम्ही तर ब्युटी क्विन आहात. त्यावर कंगना राणौत कल्याण बॅनर्जींना म्हणाल्या की, दादा तुमचा बुलंद आवाज संपूर्ण सभागृहात गर्जत असतो. आम्ही ऐकत असतो, तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद. त्यानंतर दोन्ही खासदार हसत हसत आपापल्या घरी रवाना झाले.  

टॅग्स :ParliamentसंसदPriyanka Gandhiप्रियंका गांधीKangana Ranautकंगना राणौतcongressकाँग्रेसBJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस