शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांत कोंडी फोडा, अन्यथा...

By admin | Updated: November 18, 2016 01:36 IST

तीन दिवसांत पैशांच्या टंचाईची समस्या सोडवा किंवा नोटाबंदी मागे घ्या; अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा मुख्यमंत्रीद्वयांनी सरकारला दिला

नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे पैशांसाठी देशभर गोंधळ उडाल्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर गुरुवारी घणाघाती हल्ला केला. तीन दिवसांत पैशांच्या टंचाईची समस्या सोडवा किंवा नोटाबंदी मागे घ्या; अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा मुख्यमंत्रीद्वयांनी सरकारला दिला. दोन्ही नेत्यांनी आझादपूर मंडी भागातील जाहीर सभेत मोदी सरकावर हल्ला चढविला. सरकारच्या या निर्णयामुळे देशाची आणीबाणीहूनही अधिक वाईट अवस्था झाली आहे. उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. शेतकरी संकटात सापडले असून, मजुरांची उपासमार सुरू आहे. लोकांना स्वत:चे पैसे मिळविण्यासाठी तासन्तास रांगेत धक्के खावे लागत असून, त्याची तक्रार करणाऱ्यांना ‘गद्दार’ ठरविले जात आहे, अशा शब्दांत ममता यांनी संताप व्यक्त केला. मोदींना उद्योगपतींचे पाठीराखे संबोधत केजरीवाल यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. ‘नोटाबंदीच्या नावाखाली आणि देशभक्तीच्या आडूून ८ लाख कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात येत आहे,’ असे ते म्हणाले. अंबानी, अदानी आणि विजय मल्ल्या यासारख्या अब्जाधीशांना बँकांनी ८ लाख कोटी रुपयांचे कर्ज दिलेले आहे. ही सगळी रक्कम या अब्जाधीशांनी गिळंकृत केली असून, त्यामुळे बँका कंगाल होण्याच्या मार्गावर आहेत. मोदी सरकारने या कर्जाचा नवा आणाही वसूल केलेला नाही. उलट अब्जाधीशांचे १ लाख १४ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. आता त्याची भरपाई करण्यासाठी नोटाबंदीची टूम काढली आहे. लोकांनी आपले पैसे बँकेत जमा करावेत यासाठी ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा बंद केल्या. यामुळे बँकांत दहा लाख कोटी रुपये जमा होतील, असा सरकारचा अंदाज आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)...तर आंदोलननोटाबंदीला भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरुद्धची लढाई संबोधून त्याच्या आडूून उद्योगपतींची कर्जे माफ करण्यात येत असून, कोट्यवधींचा घोटाळा सुरू आहे. हा अन्याय असून तो सहन केला जाणार नाही. सरकारने तीन दिवसांत लोकांचा त्रास दूर करावा किंवा निर्णय मागे घ्यावा; अन्यथा संपूर्ण आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूलच्याच्या सर्वेसर्वा ममता बॅनजी यांनी दिला. आम्ही जनतेच्या लढाईसाठी...आम्ही सामान्य नागरिकांच्या हक्काची लढाई लढण्यासाठी येथे आलो आहोत. आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही. आम्हाला तुरुंगात टाका किंवा गोळ्या घाला. आम्ही माघार घेणार नाही. संघर्ष सुरूच ठेवू. एक व्यक्ती प्रामाणिक बाकी सगळे चोर. एक संत आणि बाकी सगळे भ्रष्टाचारी हा युक्तिवाद आम्हाला मान्य नाही. -ममता बॅनर्जी

या पैशांतून मोदीजी आपल्या उद्योगपती मित्रांचे उर्वरित ८ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करतील. हे सर्व सामान्य जनतेची छळवणूक करून केले जात आहे. - केजरीवाल