नाशिक : द्वारका येथील कांचन मोटर्स या वाहन खरेदी-विक्री करणार्या शोरूम विरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात १ कोटी ४५ लाख ९८ हजार ९३२ रुपये अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे़
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार द्वारकाचौक येथील कांचन मोटर्स या शोरूमद्वारे नव्या-जुन्या वाहनांची विक्री तसेच खरेदी केली जाते़ या व्यवसायाचा गेली दोन वर्षांपासूनचा व्हॅट कर या शोरूमच्या वतीने भरण्यात आलेला नाही़ यामुळे विक्रीकर विभागाच्या वतीने याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात अपहार व मूल्यवर्धित कर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}