शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

‘मेक इन इंडिया’बाबत कलामांनी केले होते सावध

By admin | Updated: October 18, 2015 22:18 IST

दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ अभियानाबाबत साशंक होते. ‘मेक इन इंडिया’ अभियान महत्त्वाकांक्षी आहे

नवी दिल्ली : दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ अभियानाबाबत साशंक होते. ‘मेक इन इंडिया’ अभियान महत्त्वाकांक्षी आहे; पण त्यातून भारत स्वस्तात माल उत्पादित करण्याचा जगाचा कारखाना बनण्याचाच मोठा धोका आहे, असे कलामांना वाटत होते.कलाम यांचे निकटवर्तीय सृजप पाल यांनी लिहिलेल्या ‘अ‍ॅडव्हान्टेज इंडिया : फ्रॉम चॅलेंज टू अपॉर्च्युनिटी’ या पुस्तकात त्यांचे हे विचार मांडले आहेत. कलामांच्या या शेवटच्या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होत आहे. तत्पूर्वी, या पुस्तकातील काही भाग समोर आला आहे. ‘हॉर्पर कॉलिन्स इंडिया’ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात गत २७ जुलैला आयआयएम-शिलाँग येथे कलाम यांच्या अर्धवट राहिलेल्या भाषणाचाही समावेश आहे. आयआयएम-शिलाँग येथे भाषण सुरूअसतानाच कलाम मंचावर कोसळले होते. यानंतर काहीच वेळात त्यांचे निधन झाल्याची बातमी आली होती. रालोआ सरकारने गतवर्षी सप्टेंबरमध्ये ‘मेक इन इंडिया’चा शुभारंभ केला होता. भारतात गुंतवणुकीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण स्थान तसेच उत्पादन, डिझाईन व नवकौशल्याचे एक जागतिक केंद्र बनविणे ‘मेक इन इंडिया’चा हेतू आहे. तथापि, कलामांच्या मनात या अभियानाबाबत साशंकता होती. ‘मेक इन इंडिया’ महत्त्वाकांक्षी आहे. मात्र, भारताला आणखी मोठ्या महत्त्वाकांक्षा बाळगण्याची गरज आहे. ‘मेक इन इंडिया’सारख्या मोहिमेची देशाला गरज आहेच; पण यामुळे भारत जगासाठी केवळ एक स्वस्त उत्पादन केंद्र बनून राहण्याचा धोका आहे. या विकासाच्या मोबदल्यात देशातील जनतेला मोठी किंमत चुकवावी लागू शकते, असे मत कलाम यांनी मांडले आहे.भारतातील विकासात विसंगती आहे. आज दूरसंचार आणि टेलिकॉम क्षेत्राने नेत्रदीपक प्रगती केली आहे. मात्र, अजूनही अनेक गावांपर्यंत वीज व रस्ते पोहोचलेले नाहीत. अशा स्थितीत पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही कलामांनी म्हटले आहे. ‘अग्नी’बाबत काय प्रगती आहे, असे पलीकडून बोलणाऱ्या शेषन यांनी मला विचारले आणि माझ्या उत्तराची प्रतीक्षा न करताच, प्रक्षेपणाच्या विलंबासाठी अमेरिका व नाटोकडून प्रचंड दबाव असल्याचे मला सांगितले. यानंतर पुन्हा ‘अग्नी’बाबत काय प्रगती आहे, असे त्यांनी मला विचारले. त्याक्षणी त्या प्रश्नाचे उत्तर देणे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते; पण आता याक्षणी मागे फिरता येणार नाही, असे विचारपूर्वक उत्तर मी दिले. यावर पलीकडून माझ्यावर प्रश्नांचा भडिमार होईल, असे मला वाटले. मात्र, शेषन यांनी एक दीर्घ श्वास घेत, ‘आगे बढ़िए’ असे सांगितले.यानंतर तीन तासांनी २२ मे १९८९ रोजी ‘अग्नी’चे यशस्वी प्रक्षेपण झाले, असे कलाम यांनी यात लिहिले आहे.