Jyoti Malhotra : "पप्पा, तुम्ही खंबीर राहा, मी बेकायदेशीर काम केलेलं नाही"; जेलमध्ये काय म्हणाली ज्योती मल्होत्रा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 10:21 IST2025-05-29T10:21:04+5:302025-05-29T10:21:25+5:30
Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राची तिचे वडील हरीश मल्होत्रा यांच्याशी भेट झाली आहे.

Jyoti Malhotra : "पप्पा, तुम्ही खंबीर राहा, मी बेकायदेशीर काम केलेलं नाही"; जेलमध्ये काय म्हणाली ज्योती मल्होत्रा?
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राची तिचे वडील हरीश मल्होत्रा यांच्याशी भेट झाली आहे. मंगळवारी हिसार सेंट्रल जेल-२ मध्ये मुलीला भेटण्यासाठी हरीश आले होते. ते ज्योतीशी जवळपास २० मिनिटं बोलले. याच दरम्यान त्यांनी ज्योतीला काही कपडे दिले.
आपली मुलगी जेलमध्ये असलेली पाहून हरीश मल्होत्रा भावुक झाले. ज्योतीने वडिलांना सांगितलं की, "तुम्ही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. मी लवकरच बाहेर येईन. पप्पा, तुम्ही खंबीर राहा, मी कोणतंही बेकायदेशीर काम केलेलं नाही." वडील-मुलीची भेट सामान्य कैद्यांप्रमाणे झाली.
पाकिस्तानात फिरताना ज्योतीच्या आजुबाजुला AK-47 घेऊन ६ गनर्स, Video ने उलगडलं रहस्य
ज्योती मल्होत्राला सोमवारी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. तिचे वडील सकाळी १० वाजता जेल परिसरात गेले आणि त्यांनी त्यांच्या मुलीला भेटण्याची विनंती केली. जेलच्या रजिस्टरमध्ये नोंद केल्यानंतर त्यांना जेलच्या नियमांनुसार त्यांना आत पाठवण्यात आलं.
"पप्पा, टेन्शन घेऊ नका, वकील पाहू नका, मी लवकर बाहेर येईन"; ज्योती मल्होत्राची वडिलांशी भेट
हरीश मल्होत्रा यांना ज्योतीला भेटण्याची परवानगी देण्यात आली. पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर मी बाहेर येईन असं ज्योतीने वडिलांना सांगितलं. पोलिसांनी १८ मे रोजी ज्योतीला अटक केली आणि तिला पाच दिवसांची कोठडी सुनावली. त्यानंतर २३ मे रोजी तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं आणि चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आता २६ मे रोजी न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली.
ज्योतीने मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर; पोलिसांना मिळाले अनेक महत्त्वाचे पुरावे
ज्योती मल्होत्राच्या प्रकरणात पोलीस वेगाने तपास करत आहेत. चौकशीदरम्यान हरियाणा पोलिसांनी तिच्या मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर केला, ज्यामुळे अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले. फॉरेन्सिक तपासणीनंतर पोलिसांना काही पुरावे सापडले आहेत जे या संपूर्ण प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्यास खूप मदत करू शकतात.