शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
2
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
3
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
4
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
5
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
6
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
7
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
8
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
9
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
11
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
14
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
15
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
16
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
17
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
18
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
19
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
20
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
Daily Top 2Weekly Top 5

न्या. शरद बोबडे आज होणार सरन्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 06:19 IST

महाराष्ट्राला तिसऱ्यांदा मिळेल सर्वोच्च मान

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे सोमवारी भारताचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारतील. न्या. बी. पी. गजेंद्रगडकर व न्या. यशवंत चंद्रचूड यांच्यानंतर न्यायसंस्थेतील या सर्वोच्च पदाचा मान महाराष्ट्राला तिसऱ्यांदा मिळणार आहे.

सोमवारी सकाळी राष्ट्रपती भवनात होणाºया साध्या समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद न्या. बोबडे यांना सरन्यायाधीशपदाची शपथ देतील. सन २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या न्या. बोबडे यांची सरन्यायाधीशपदाची कारकिर्द सुमारे दीड वर्षाची असेल. वयाची ६५ वर्षे पूर्ण होतील तेव्हा म्हणजे २३ एप्रिल २०२१ रोजी ते निवृत्त होतील. आधीचे सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई सुमारे १३ महिन्यांच्या कारकिर्दीची ऐतिहासिक अयोध्या निकालाने सांगता करून रविवारी सायंकाळी निवृत्त झाले. आपले उत्तराधिकारी म्हणून न्या. बोबडे यांच्या नावाची शिफारस महिनाभरापूर्वी त्यांनी केली होती. त्यानुसार ३० ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींनी न्या. बोबडे यांची १८ नोव्हेंबरपासून सरन्यायाधीश म्हणून नेमणूक केली होती.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या निमित्ताने तब्बल साडेतीन दशकांनंतर मराठी माणूस सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारणार आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातील विधी क्षेत्र राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे कुटुंबीय, नातेवाईक व मित्र मंडळींची उपस्थिती या सोहळ््यात लक्षणीय ठरणार आहे. न्या. बोबडे मुळचे नागपूरचे असल्याने व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी अनेक वर्षे प्रॅक्टीस केल्याने नागपुरातील बहुतांश मंडळी शपथविधी सोहळ््याला उपस्थित राहणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश नितीन सांबरे, महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे, अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांच्यासह आदी मंडळी दिल्लीत दाखल झाली आहेत. अनेकांना न्या. बोबडे यांनी खासगी निमंत्रण पाठविले आहे.

सकाळी साडेदहा वाजता सरन्यायाधीश बोबडे आणि न्या. भूषण गवई यांच्यासमक्ष न्यायालयीन सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा देखील एक ऐतिहासिक क्षण नागपूरकरांसाठी असणार आहे. वकील, अतिरिक्त न्यायाधीश, न्यायाधीश आणि सरन्यायाधीश या एकूण प्रवासात त्यांच्यासोबत राहीलेले अनेक मित्र, सहकारी, ज्युनियर्स, पत्रकार या निमित्ताने दिल्लीत दाखल झाले आहेत.

दिल्लीतील मराठी वकिलांमध्ये आनंद : राजधानी दिल्लीत सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या मराठी माणसांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. जवळपास सर्वांसाठीच मराठी सरन्यायाधीशांच्या कार्यकाळात काम करण्याची ही पहिली वेळ असणार आहे. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालये मिळून २०० अधिक मराठी वकील मंडळी दिल्लीत कार्यरत आहेत.

न्यायाधीशांना सूचना
मुंबई उच्च न्यायालय, नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथील न्यायाधीशांना शपथविधीसाठी सुट्या घेऊन दिल्लीत येऊ नका, अशा सूचना सरन्यायाधीशांनी दिल्या आहेत. न्यायालयाच्या कामकाजावर परिणाम होऊ नये, या उद्देशाने न्या. बोबडे यांनी या सूचना दिल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय