शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीश नियुक्त्यांची कोंडी फुटण्याची चिन्हे

By admin | Updated: September 13, 2016 04:17 IST

सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून सरकार आणि न्यायव्यवस्थेदरम्यानच्या तीव्र मतभेदांमुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्याच्या प्रयत्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेत

हरीश गुप्ता,  नवी दिल्लीसर्वोच्च आणि उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून सरकार आणि न्यायव्यवस्थेदरम्यानच्या तीव्र मतभेदांमुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्याच्या प्रयत्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेत सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्याशी चर्चा केली. ४५० न्यायिक नियुक्त्या रखडल्याने सरन्यायाधीश ठाकूर यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. शुक्रवारी दोघांत दोन तासांहून अधिक वेळ चर्चा झाल्याचे समजते. माहीतगार सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मेमोरंडम आॅफ प्रोसिजरला (एमओपी) लवकर अंतिम स्वरूप द्यावे, अशी मोदींची इच्छा आहे. या प्रोसिजरनुसार राज्य सरकार, उच्च न्यायालये, राज्यपाल, केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय आणि अन्य संबंधित संस्था सर्वोच्च आणि उच्च न्यायालायात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात येणाऱ्या व्यक्तींची नावे निश्चित करण्यासाठी निर्णायक निष्कर्ष काढतील.

सरन्यायाधीशांसह पाच वरिष्ठ न्यायाधीशांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची मात्र मेमोरंडम आॅफ प्रोसिजरमध्ये बदल करण्यासंदर्भात सरकारची सूचना मान्य करण्याची इच्छा नाही. न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी कॉलेजियमने शिफारस केलेल्या, परंतु सचोटी आणि प्रामाणिकतेबाबत शंका असलेल्या किंवा गुप्तचर विभागाने शहानिशा केल्याअंती नियुक्तीसंदर्भातील निकषांची पूर्तता न करणाऱ्यांची नावे यादीतून वगळण्यात यावीत, अशी सरकारची इच्छा आहे.उच्च न्यायालयात न्यायाधीशांची १६५ पदे सरकारने निर्माण केली आहेत, परंतु न्यायसंस्थेने ही पदे भरण्याची प्रक्रियाच पूर्ण केलेली नाही. उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी ७४ जणांच्या नावांना पंतप्रधान लवकरच मंजुरी देतील, परंतु दोनशेहून अधिक नवीन न्यायाधीशांच्या नियुक्तीसंदर्भात काही पारदर्शक प्रक्रिया पार पाडणे जरूरी आहे. सरन्यायाधीश ठाकूर जानेवारीत निवृत्त होणार आहेत, तसेच दसरा आणि नाताळदरम्यान कोर्टाला सुट्टी असेल. तेव्हा नवीन नावांसंदर्भात प्रक्रिया करण्यास पुरेसा अवधी मिळणार नाही.